आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two More Minor Girls Raped In Delhi, Kejri Attacks PM

दिल्लीमध्ये आणखी दोन चिमुरड्यांवर सामुहिक बलात्कार, प्रकृती गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एका चार वर्षीय चिमुरडीवर बलात्काराच्या प्रकरणाला आठवडा उलटण्याआधीच दिल्लीत दोन वेगवेगळ्या घटनांत आणखी दोन चिमुरड्यांवर सामुहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही बालिकांना मोठ्या प्रमाणावर जखमा असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

पहिल्या घटनेत दोघांनी शुक्रवारी एका अडीच वर्षाच्या मुलीवर दिल्लीच्या नांगलोई भागात नेऊन बलात्कार केला. तिला मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी घराबाहेरून उचलून नेले होते. शेजाऱ्यांनी शोधाशोध केली तेव्हा एका पार्कजवळ ती बेशुदधावस्थेत पडलेली आढळून आली. तिच्या शरिरावर अनेक जखमा आढळल्या आहेत. घराजवळ रामलीला पाहायला गेली त्यावेळी मुलीचा उचलून नेल्याचा दावा तिच्या आईने केला आहे.

या चिमुरडीच्या शरिरावर चावा घेतल्याच्याही अनेक खुणा आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी याबाबत माहिती दिली. मालिवाल यांनी आज तिची भेट घेतली. मालिवाल यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. अद्याप या प्रकरणामध्ये कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
दरम्यान शुक्रवारीच दिल्लीच्या आनंद विहार परिसरामध्ये तिघांनी एका पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटनाही समोर आली आहे. ही मुलगी घरात होती त्यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या एकानेच तिला घरातून बाहेर नेले आणि मित्रांसह तिच्यावर बलात्कार केला. इतर शेजाऱ्यांनी तिला आरोपीच्या घरातून बाहेर येताना पाहिले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. ती रडत होती आणि तिचे कपडे रक्ताने माखलेले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले. तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
केजरीवालांचा मोदींवर हल्ला
दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरद्वारे या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उप राज्यपाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. पोलिस दिल्लीच्या नागरिकांची सुरक्षा करण्यात अपयशी ठरल्याचे केजरीवाल म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान आणि त्यांचे उपराज्यपाल काय करत आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. पीडित बालिकांना भेटण्यासाठी जात असल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, केजरीवाल यांचे ट्विट...