आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two More Of IS Linked Group Detained, To Be Handed Over To NIA

प्रजासत्ताक दिनी ISISच्या हल्ल्याचा कट उधळला; दोन संशयितांना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनी देशात मोठा हल्ल्याचा कट सुरक्षा संस्थेने उधळून लावला. जहाल दहशतवादी संघटना ISIS च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्‍यात आली आहे. एकाला हैदराबादेतून तर दुसर्‍याला महाराष्‍ट्रातून अटक करण्‍यात आले.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या आधी पोलिसांनी सुरु केलेल्या धाडसत्रात एकूण 30 संशयितांना अटक करण्‍यात आले आहे. सर्व दहशतवादी 26 जानेवारीला देशात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते. दहशतवादी विदेशी नागरिक व पोलिसांना टार्गेट करणार होते, अशी माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) दहशतवाद्यांची कसून चौकशी करत आहे.
कुठून पकडले दहशतवादी, काय होता त्यांचा हेतू?
- सुरक्षा संस्थांनी देशाभरात धाडसत्र सुरु करून 30 संशयितांना अटक केले आहे. प्रजासत्ताक दिनी मोठा घातपात करण्याच्या इराद्याने सर्व देशभरात विखुरले गेले होते. एकाला हैदराबाद तर दुसर्‍याला महाराष्ट्रातून अटक करण्‍यात आले.
- दोघांची कसून चौकशी सुरु असून बुधवारी एनआयएच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
- एनआयएने आतापर्यंत 30 संशयितांना अटक केले आहे. सर्व 'जैनूद-उल-खलीफा-ए-हिंद' (आर्मी ऑफ दी खलीफा इंडिया) संबंधित आहे. 'जैनूद-उल-खलीफा-ए-हिंद' ही ISIS ची एक विंग आहे.
कसे होते संपर्कात?
- एनआयएने केलेल्या दाव्यानुसार, अटक करण्‍यात आलेले सर्व संशयित स्काइप, सिग्नल, ट्रिलियनसारख्या साइट्सने थेट सीरियातील ISIS च्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते.
- देशातील युवांना सहभागी करून घेण्यासाठी सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करत आहे.
शेख फॉलो करतो बगदादीचे आदेश...
- अटक करण्‍यात आलेल्यांमध्ये 'अमीर' नामक ग्रुपचा मेंबर मुद्दबिर मुश्ताक शेखचा समावेश आहे.
- शेख भारत व भारताबाहेर ISISसाठी काम करतो.
- शेखला थेट बगदादीकडून आदेश मिळतात व ते तो फॉलो करतो.

पुढील स्लाइडवर वाचा, कुठे रचला होता हल्ल्याचा कट...