आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजधानी दिल्लीत एकाच दिवशी दोन हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - हत्येच्या दोन घटनांनी मंगळवारी राजधानी दिल्ली हादरली. एका घटनेत अब्जाधीश आणि बसपा नेत्याची फार्महाऊसवर हत्या करण्यात आली. दुस-या घटनेत पतीने भरदिवसा मेट्रो स्थानकावर पत्नीवर गोळी झाडली. 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवणारे बिल्डर दीपक भारद्वाज यांच्यावर मंगळवारी त्यांच्या फार्महाऊसवर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. दीपक यांच्या छाती आणि पाठीवर गोळ्या लागल्या आहेत. फार्म हाऊसच्या कर्मचा-यांनी तत्काळ पोलिसांनी याची माहिती दिली. दीपक यांना धौलाकुआंजवळील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हत्येच्या दुसरी अमानुष घटना दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी कडकडडूमा मेट्रो स्थानकावर घडली. पवन नावाच्या व्यक्तीने पत्नी आणि सास-याला गोळी मारली. पत्नीचा घटनास्थळीचा मृत्यू झाला. घटनेत जखमी झालेल्या सास-याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृत पत्नीचे नाव दीप्ती (25) तर वडिलांचे नाव बिशनदास (55) असे आहे. पवनने दोघांवर पाच फैरी झाडल्या. पोलिसांनी घटनास्थळाहून काही काडतुसे जप्त केली आहेत. घटनेमागे कौटुंबिक वादाचे कारण असू शकते, असे पोलिसांना वाटते.

मेट्रो स्थानकावर पत्नी, सास-यावर गोळीबार
पोलिसांकडे गाडीचा नंबर आहे. परिचयातील व्यक्तीनेच ही हत्या घडवून आणली असावी, असा आमचा अंदाज आहे, असे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी सांगितले. प्रॉपर्टी व्यवसायाशी संबंधित एखाद्या वैरातून ही घटना घडली असावी. दीपक यांनी अलीकडे काही मोठा सौदा तर केला नव्हता ना, याचाही तपास करण्यात येत आहे. पोलिसांची 74 पथके हल्लेखोराच्या शोधात गुंतली आहेत.

सुरक्षा रक्षकाला धमकावले
घटनेचे फुटेज वृत्त वाहिन्यांवर दाखवण्यात आले आहे. त्यात हल्लेखोरांनी सुरक्षा रक्षकास बंदुकीने धमकावले. त्यानंतर प्रवेशद्वार उघडून गाडीतून पोबारा केल्याचे त्यात पाहायला मिळते. दीपकची पत्नी, मुलगा द्वारकेत राहतात. त्यामुळे घटनेला अनेक बाजू आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

चौकशीचा बहाणा
तीन हल्लेखोर सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्या फार्म हाऊसवर आले. प्रवेशद्वाराबाहेर गाडी पार्क करत त्यांनी चौकशीच्या बहाण्याने प्रवेश केला. फार्म हाऊस बुक करण्याचे कारण त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना प्रवेश मिळाला. काही वेळाने त्यांना दीपक भारद्वाज दिसले. त्याचवेळी तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

कोण होते दीपक भारद्वाज ?
दीपक भारद्वाज 2009 मध्ये लोकसभा निवडणुकीत पश्चिम दिल्लीतून बसपाचे उमेदवार होते. त्यावेळी भारद्वाज यांनी निवडणूक आयोगाकडे दिलेल्या शपथपत्रात संपत्तीचा आकडा 603 कोटी रुपये असल्याचे नमूद केले होते. प्रॉपर्टी व्यवसायाबरोबरच ते अनेक शाळा आणि हॉटेलचेदेखील मालक होते.