आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Pages Of File Pertaining To Robert Vadradlf Land Deal Missing From Haryana Government Records News In Marathi

हरियाणातील जमीन प्रकरण: रॉबर्ट वढेराच्या फाईलमधील दोन पाने गहाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांच्या हरियाणातील जमीन प्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ती म्हणजे वढेरा यांच्या जमीन लिलाव प्रकरणाच्या फाईलमधील दोन पाने गहाळ झाल्याचे उघड झाले आहे. आयएएस अधिकारी अशोक खेमका यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून ही धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

गहाळ झालेल्या पानांवर अधिकार्‍यांनी काही टिपण्णी लिहिली होती, असेही खेमका यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाल्याने अशोक खेमका यांना सीएम ऑफिसमधील कर्मचार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

जमीन घोटाळ्याची चौकशी करणार्‍या तीन सदस्यांच्या समिती संदर्भातील माहिती ही गहाळ झालेल्या दोन पानांवर होती. विशेष म्हणजे याच समितीने वढेरांची कंपनी स्कायलाईटला क्लीन चीट दिली होती. तसंच डीएलएफ-स्कायलाईट डीलचे म्युटेशन रद्द करणार्‍या आयएएस अशोक खेमका यांच्यावर अविश्वास दाखवला होता.