आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाजियाबाद: पतीला लॉकअपमध्ये बंद करुन पत्नीवर सामूहिक बलात्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीला लागून असलेल्या गाजियाबादमध्ये पतीला तुरुंगात कैद करुन महिलेवर पोलिस चौकीतच गँगरेपचा प्रकार समोर आला आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना मंगळवारी अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण
गाजियाबादच्या विजयनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी एका महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांनतर पतीला सोडण्याच्या बदल्यात 15 हजार रुपयांची मागणी केली. महिलेचा आरोप आहे, की पैसे घेतल्यानंतरही पोलिसांनी तिच्या पतीची मुक्तता केली नाही. ती पतीच्यासुटकेसाठी पोलिस स्टेशनला गेली तेव्हा पोलिस कर्मचाऱ्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यावेळी तिचा पती लॉकअपमध्ये बंद होता. महिलेने पोलिसांनी लाच मागितल्याचे मोबाइलमध्ये रेकॉर्डिंग केले होते. तिने ते रेकॉर्डिंग पोलिस अधीक्षक धर्मेंद्र यादव यांना दिले आहे.