आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Police Men Not Accepted To Fire On Ishrat, CBI Say In Its Charge Sheets

इशरतला गोळी घालण्यास दोन पोलिसांचा नकार, सीबीआयचा आरोपपत्रात दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इशरत जहाँ चकमकीच्या वेळी गुजरात पोलिसांच्या दोन निरीक्षकांनी इशरतला मारण्यास नकार दिला होता. परंतु तरुण बारोट नावाच्या पोलिस निरीक्षकाने रिव्हॉल्व्हर घेत इशरतवर गोळी घातली होती, असा दावा सीबीआयने केला आहे. तपास संस्थेने आरोपपत्रात हा दावा केला.


इशरतला गोळी घालण्यास इब्राहिम चौहान, नानगी यांनी नकार दिला होता. इशरत व जावेद खानला मारण्यासाठी तीन दिवस अगोदर अपहरण करून अहमदाबादमध्ये आणण्यात आले होते. 15 जून 2004 मध्ये झालेल्या चकमकीत इशरतसह चार दहशतवादी ठार झाले होते, असा गुजरात पोलिसांचे म्हणणे आहे. सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केल्यामुळे भाजप व काँग्रेस परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. इशरतचा दहशतवाद्यांशी संबंध नव्हता तर तिच्या मृत्यूनंतर दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने आपल्या संकेतस्थळावर तिला शहीद असे म्हटले होते.