आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two State Ministers For Home Remarked Different On Daud

दाऊदबाबत दोन गृह राज्यमंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्ये, दाऊद पाकिस्तानातच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे याचा सरकारला चार महिन्यांतच विसर पडला. ‘अद्याप दाऊदच्या ठावठिकाण्याबाबत काही माहिती नाही. पत्ता लागला की प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू होईल,’असे गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी मंगळवारी संसदेत सांगितले.
दाऊद कुठे आहे, या भाजप खासदार नित्यानंद राय यांच्या प्रश्नावर हरिभाईंनी ही माहिती दिली. दुसरीकडे ‘दाऊद पाकिस्तानमध्येच असून त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी पाककडे करण्यात आली आहे,’ असे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी गेल्या डिसेंबरमध्ये सांगितले होते. त्यामुळे सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधकांनी केली. त्यामुळे सरकारने तसेच भाजपने स्पष्टीकरण दिले. संध्याकाळी गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले, ‘सरकार आधीच्या भूमिकेवर ठाम आहे. दाऊद पाकमध्येच आहे.

पंतप्रधान, गृहमंत्रीही म्हणाले होते, दाऊद पाकिस्तानमध्येच
२७ डिसेंबर २०१४ : गृहमंत्री राजनाथसिंह म्हणाले होते,‘दाऊद पाकमध्येच आहे. त्याला सोपवावे, अशी मागणी आम्ही अनेकदा पाककडे केली आहे.’
१२ ऑगस्ट २०१४ : राजनाथ म्हणाले होते, दाऊदच्या अटकेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तो कुठेही दडला तरी त्याला अटक करूच.
२६ एप्रिल २०१४: मोदी गुजराती चॅनलवर म्हणाले होते - मी पंतप्रधान झालो तर दाऊदला कसाही पाकिस्तानातून खेचून आणीन.
भारताने सोपवले दस्तएेवज : सरकारने २००८ व २०११ मध्ये २० अतिरेक्यांच्या प्रत्यार्पणासाठी पाककडे दस्तऐवज सोपवले. दा‌‌ऊद नंबर २ वर होता.
टेपमध्येही लोकेशन : याच वर्षी फेब्रुवारीत दोन मिनिटांची ऑडिअो टेप समोर आली होती. त्यात दा‌‌ऊद इक्बाल नावाच्या व्यक्तीशी बोलताना आपण कराचीमध्ये असल्याचे सांगत होता.

२०१३ मधील उत्तर केले काॅपी-पेस्ट
अमित मिश्रा, नवी दिल्ली | गृह राज्यमंत्री हरिभाई चौधरींचे उत्तर प्रत्यक्षात दोन वर्षांपूर्वीच्याच उत्तराची कॉपी आहे. २०१३ मध्ये रमादेवींनी प्रश्न केला होता, दाऊद इब्राहिम कुठे आहे? उत्तरात यूपीए सरकारचे गृह राज्यमंत्री एम. रामचंद्रन म्हणाले होते - ‘त्याचे स्थान माहीत नाही. ते कळल्यावर प्रत्यार्पण प्रक्रिया सुरू होईल.’ तेव्हा भाजपने सरकारची चांगलीच कोंडी केली होती. आता तेच उत्तर आजच्या सरकारने दिले आहे. गृह सचिवांकडून उत्तर मागितले आहे. काही अधिका-यांवर कारवाई शक्य आहे.

भास्कर एक्स्पर्ट
मंत्र्यांची चूकच, या विधानांनी आपली टर उडवली जाते
सं सदेतील मंत्र्यांचे वक्तव्य चूकच आहे. दाऊद कराचीतच राहतो. क्लिफ्टन भागातील डिफेन्स हाउसिंग सोसायटीत त्याचा बंगला आहे. त्याच्या शेजा-यालाही माहीत आहे की उंच भिंती असलेला बंगला दाऊदचाच आहे. मी त्याच क्लिफ्टन भागात चार वर्षे राहिलो असून दाऊदचे घरही पाहिले आहे. यामुळे त्याचा ठावठिकाणा माहीत नाही, असे सरकारचे म्हणणे चुकीचे आहे. आपल्या गुप्तचर संस्थांनी आधीच अमेरिकेच्या सीआयए व इंटरपाेलला दाऊदचा पत्ता सांगितलेला आहे. २००१ मध्ये राष्ट्रपती मुशर्रफ दिल्लीला आले होते तेव्हाचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी वैयक्तिकरीत्या दाऊदला सोपवण्यास सांगितले होते. आजच्या वक्तव्यांमुळे राजनयिक अाघाडीवर आपण दुबळे पडताे. जगभरात अापली टर उडवली जाते. पाकिस्तानात मीडियापासून सरकारही म्हणू लागते - ‘पाहा भारत स्वत: सांगतोय की दाऊदचा पत्ता माहीत नाही. म्हणजे तेथील सरकारचे आधीचे दावे खोटे आहेत’
-जी. पार्थसारथी, पाकमधील माजी उच्चायुक्त