आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एअरहोस्टेसशी तरुणांनी केले असे कृत्य, एअरपोर्टवर अशी ओरडत राहिली तरुणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - इंडिगो एअरलाइन्स पुन्हा एकदा चर्चेत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात एक इंडिगो महिला कर्मचारी दोन तरुणांवर आरोप करताना दिसत आहे. महिला म्हणाली, दोघांनी तिची छेड काढली. या व्हिडिओत आरोपी आपल्या चुकीसाठी त्या महिलेच्या पायाही पडताना दिसत आहेत. ही घटना हैदराबादच्या राजीव गांधी एअरपोर्टवर घडली. 

 

सकाळच्या शिफ्टची रिपोर्ट द्यायला येत होती महिला...
- महिला कर्मचारी आपल्या सकाळच्या शिफ्टची रिपोर्ट द्यायला एअरपोर्टला येत होती. तिने पाहिले की, पार्किंग एरियापासून दोन जण तिचा पाठलाग करत आहेत. 
- भारत आणि कल्याण नावाचे हे दोघे तिच्यावर घाणेरड्या कॉमेंट्स पास करत होते.
- ते दोघे कॉमेंट करत असताना महिलेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करून एअरपोर्टकडे चालणे सुरू ठेवले. तेवढ्यात टॅक्सी प्रीपेड काउंटरजवळ त्यातील एकाने महिलेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला.
- या कृत्यानंतर महिलेने लगेच एअरपोर्ट उपस्थित एका ट्रॅफिक पोलिसाला आवाज दिला. ट्रॅफिक पोलिसाने या दोघांना पकडून पोलिस स्टेशनला नेले. आरोपींना पोलिसांत नेल्यावर तेथे महिला कर्मचाऱ्याशिवाय इंडिगो स्टाफही उपस्थित होता.

 

आरोपी होते मद्य प्यायलेले
- सूत्रांनुसार, छेडछाड करणाऱ्या या दोघांनी दारू प्यायलेली होती. व्हिडिओत दोघेही एअरहोस्टेसच्या पाया पडताना दिसताहेत. व्हिडिओत म्हणताना स्पष्ट दिसत आहेत की, आमच्याविरुद्ध तक्रार करू नका.
- तथापि, दोघेही आरोपी असल्याने एअरहोस्टेसने दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केली नाही. पोलिसांनी एअरपोर्टवर गोंधळ घालणे, कामात व्यत्यय आणणे या आरोपांनी प्रकरणाची नोंद केली आहे.
- इंडिगोचे अधिकारी म्हणाले, दोघांना पोलिसांनी पकडताच ते स्टाफ मेंबरची माफी मागू लागले. यानंतर आमच्या स्टाफ मेंबरने दोघांविरुद्ध अधिकृत तक्रार दिली नाही. काही तासांत कस्टडीत ठेवल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी विद्यार्थ्यांना ताकीद देऊन सोडले.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...