आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात MBBS करणा-या पुणे, नवी मुंबईतील 2 तरूणींचा आगीत मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्यतील करिश्मा भोसले (फाईल फोटो) - Divya Marathi
पुण्यतील करिश्मा भोसले (फाईल फोटो)
पुणे/नवी दिल्ली - पश्चिम रशियातील एका वैद्यकीय विद्यापीठातील विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील चाैथ्या मजल्यावर लागलेल्या अागीत महाराष्ट्राच्या दाेन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी साेमवारी रात्री टि्वटवर माहिती दिली. त्यापैकी एक युवती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती अाहे. माॅस्काेपासून ४०० किलाेमीटर अंतरावर असलेल्या स्माॅलेन्स्क वैद्यकीय विद्यापीठात रविवारी लागलेल्या भीषण अागीत भाजून या दाेघींचा मृत्यू झाला तर अन्य काही विद्यार्थिनी जखमी झाल्याचे वृत्त अाहे. सुषमा स्वराज म्हणाल्या, ‘या दुर्घटनेत अापण दाेन भारतीय विद्यार्थिनी गमावल्या अाहेत.’

त्या दाेघीही महाराष्ट्रातील रहिवाशी अाहेत. भारतीय दूतावासातील अधिकारी घटनास्थळी पाेहाेचले अाहेत. या दाेघींचेही मृतदेह मंगळवारी माॅस्काेत अाणले जाणार अाहेत, त्यानंतर ते मुंबईत अाणण्यात येतील. या कुटुंबियांच्या दु:खात भारत सरकार सहभागी अाहे.’
धुरामुळे गुदमरुन दोघींचा मृत्यू
- पुण्याची करिश्मा भोसले आणि नवी मुंबईची पूजा कुल्लर अशी मृत विद्यार्थिनींची नावे आहेत.
- पूजा कुल्लर आणि करिश्मा भोसले या रुममेट होत्या. त्‍या एमबीबीएसच्या चौथ्या वर्षात शिकत होत्या.
- अग्निशमन दलाचे जवान रुममध्ये गेल्‍यावर त्‍यांना दोन्ही मुलींचे मृतदेह आढळले.
- धुरामुळे गुदमरुन दोघींचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे.
पुढील स्‍लाइड्रसवर पाहा, आगीचा फोटो....