आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोएडामधून दोन दहशतवाद्यांना अटक, घातपात घडवून आणण्याचा कट उधळला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्‍लीला लागून असलेल्या नोएडामध्ये दोन दहशतवाद्यांना अटक केल्याचे वृत्त आहे. यात एका बांगलादेशी नागरिकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या दोघांना 19 डिसेंबरला अटक करण्यात आली आहे.
उत्‍तर प्रदेश पोलिस, पश्चिम बंगाल एटीएस आणि गुप्तचर संस्थेच्या पथकांनी मिळून यांना अटक केली आहे. रॉ आणि आयबीने त्याची चौकशीही केली आहे. या दोघांच्या लॅपटॉप आणि चौकशीतून काही खळबळजनक माहिती समोर आली आहे. देशातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. यासंदर्भात अधिक माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. नोएडामध्ये अनेक दहशतवादी घुसलेले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
यादरम्यान महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्क्वाड (एटीएस) ने कोर्टात एका चर्चेचा मजकूर सादर केला आहे. त्यात एटीएसने पकडलेल्या अनिस अन्सारी आणि उमर एलहाजी नावाच्या एका व्यक्तीच्या ऑनलाइन चॅटबाबतचा हा मजकूर आहे. चॅटमध्ये मुंबईच्या अमेरिकन स्कूलवर हल्ला करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. हा कट बराचसा पेशावरमध्ये झालेल्या आर्मी स्कूलवरील हल्ल्यासारखाच असल्याची माहितीही समोर आली आहे. पेशावरच्या या शाळेवर गेल्या महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 132 मुलांसह 145 जण ठार झाले होते.

मल्टी नॅशनल सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा 24 वर्षीय अन्सारी ISIS चा समर्थक असल्याचे सांगितले जाते. अमेरिकेशी संबंधित ठिकाणांवर हल्ल्याचा कट रचण्याच्या आरोपात अन्सारी याला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अंधेरीमधून त्याच्या कार्यालयातून अटक केली होती.