आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन तृतीयांश भारतीय लाच देतात; ‘चहापाण्या’वर भर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन / नवी दिल्ली - लाच देण्यामध्ये भारत देश आशिया प्रशांत प्रदेशात आघाडीवर आहे. सुमारे दोन तृतीयांश भारतीय आपले काम करवून घेण्यासाठी “चहापाण्या’ साठी किंवा इतर स्वरुपात लाच देतात, असे एका पाहणीतून सिद्ध झाले आहे.

६९  टक्के भारतीयांनी ते  लाच देतात,अशी कबुली दिली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील भ्रष्टाचार निर्मूलनाचे काम करणाऱ्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने यासंबंधीचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. भारतानंतर व्हिएतनामचा नंबर लागतो.  लाच देणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ६५ टक्के आहे, तर चीनमध्ये हे प्रमाण खूप कमी असून तेथे २६ टक्के जनता लाच देते. तर पाकिस्तानमध्ये लाच देणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ४० टक्के आहे. जपानमध्ये हेच प्रमाण अवघे ०.२ % इतके आहे. तर दक्षिण कोरियामध्ये अवघे ३ टक्के नागरिक लाच देण्यास राजी आहेत. 
चीनमध्ये लाच देण्याचे प्रमाण  वाढले आहे. तर भारत सातव्या स्थानावर आहे. त्या खालोखाल पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया, जपान, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंडचा क्रमांक लागतो. ही चाचणी आशिया प्रशांत भागात असलेल्या  १६ देशातील सुमारे २० हजारांहून अधिक लोकांनी केली.  त्यांना ९०० दशलक्ष लोकांनी आपण वर्षभरापासून लाच देत असल्याचे सांगितले. लाच घेण्यात पोलिस  वरच्या स्थानावर असून ३८ टक्के  गरीब लोकांनी लाच दिल्याचे  सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...