आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडगावमध्ये धावत्या कारमध्ये दोन महिलांवर बलात्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुडगांव- देशाची राजधानी दिल्लीमध्ये मानवतेला काळीमा फासणारी आणखी एक घटना उघडकीस आली आहे. गुडगावमध्ये काल (बुधवारी) दोन महिलांवर धावत्या कारमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजधानीतील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांनुसार, गुडगावमधील एका मॉलजवळ या दोन्ही महिला उभ्या होत्या. एक कार त्यांच्याजवळ येऊन थांबला. त्यात काही तरुण बसले होते. त्यांनी महिलांना लिफ्ट देण्याचे आवाहन केले. महिलांनी ते स्विकारले. त्यानंतर तरुणांनी दोन्ही महिलांवर धावत्या कारमध्ये आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर दोघींना शहराबाहेर उतरवून दिले आणि तेथून ते पसार झाले. दोन्ही महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलिस करत आहेत.