आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Two Years Ago Upa Discussed An Offer From Dawood Ibrahim To Return Home

2013 मध्‍ये भारतात येऊ इच्छित होता दाऊद; UPA सरकारने घेतली नाही रिस्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा दोन वर्षांपूर्वी भारतात परत येण्‍यासाठी इच्‍छुक होता. पण, त्‍यासाठी त्‍याने ठेवलेल्‍या अटी तत्‍कालीन केंद्र शासनाने फेटाळून लावल्‍यात, असा दावा कॉंग्रेसचा नेता असलेल्‍या एका दिल्‍लीतील वकिलाने केला. या बाबतचे वृत्‍त ‘इंडियन एक्सप्रेस’ ने प्रसिद्ध केले. या वृत्‍तानुसार, या मुद्दयावर त्‍यावेळी सरकारमध्‍ये वरिष्‍ठ पातळीवर चर्चा झाली. पण, दाऊत याच्‍या अटी मान्‍य केल्‍या गेल्‍या नाहीत.
कॉंग्रेस नेता असलेल्‍या वकिलाने घेतला होता पुढाकार
या वृत्‍तानुसार, कॉंग्रेसचे एक वरिष्‍ठ नेते जे की वकील आहेत त्‍यांनीच पक्षाचे वरिष्‍ठ आणि केंद्र सरकारकडे दाऊदचा प्रास्‍ताव ठेवला होता. हा नेता दाऊत अनेक खटल्‍याशी संबंधित आहे. त्‍याने कॉंग्रेसच्‍या दोन मोठ्या नेत्‍याच्‍या पुढेही दाऊदचा प्रस्‍ताव ठेवला होता. मात्र, त्‍यांनी दाऊद अटींची पूर्तता होणार नसल्‍याचे स्‍पष्‍ट सांगितले. आपल्‍यावर भारतात खटला चालवला जावा, असे दाऊत वाटत होते. पण, हा खटला आपल्‍या अटी आणि शर्ती मान्‍य करून चालवला जावा, असा त्‍याचा प्रस्‍ताव होता. परंतु, त्‍याच्‍या अटी मान्‍य करण्‍यासारख्‍या नसल्‍याने कॉंग्रस सरकारने तो फेटाळून लावला.
मनमोहन सिंह आणि एनएसएनेही प्रस्‍ताव फेटाळला
या बाबत तत्‍कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नॅशनल सिक्युरिटी अडवाइजर (एनएसए) शिवशंकर मेनन यांच्‍यात चर्चाही झाली. पण, दोघेही या बाबत रिस्क घेण्‍याच्‍या तयारीत नव्‍हते. दरम्‍यान, ''अशा प्रकारची कोणतीही चर्चा झाल्याचे स्मरत नाही'', असे उत्‍तर मनमोहन सिंग यांनी ई मेलद्वारे दिले तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत.
किडनीच्‍या आजाराने त्रस्‍त झाला होता दाऊत
वर्ष 2013 मध्‍ये दाऊदला किडनीच्‍या आजाराने ग्रासले होते. त्‍यामुळे आपले उर्वरित आयुष्‍य आपल्‍या कुटुंबासोबत व्यतीत करता यावे, यासाठी त्‍याने हा प्रस्‍ताव ठेवला होता. शिवाय १९९३ बॉम्बस्फोट मालिकेसंदर्भातील खटल्याला सामोरे जायची तयारीही त्‍याने दर्शवली होती. बॉम्बस्फोटानंतर दाऊद हा दुबईत पळून गेला. तेथे त्याच्या वकिलांनी दाऊदचे वकीलपत्र तयार करून मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचे कामकाज दिल्लीत चालवण्याचे विनंतीपत्र सर्वोच्च न्यायालयाकडे देण्यासाठी तयार केले होते. दाऊदला मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचे 'निर्दोषत्व'सिद्ध करायची इच्छा होती, असेही या काँग्रेस नेत्याने स्पष्ट केले आहे.