आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दोन तरुणींनी ऑटो चालकावर केला बलात्काराचा प्रयत्न, दोघींना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- समाजाची मानसिकता आणि गुन्हेगारीचे स्वरुप कसे बदल आहे हे या बातमीवरुन दिसून येते. दोन तरुणींनी एक रिक्षा चालकावर बलात्काराचा प्रयत्न केला. यावेळी रिक्षा चालकाने इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. यात त्याचे दोन्ही पाय फ्रॅक्टर झाले. दोन्ही तरुणींना अटक करण्यात आली असून ऑटो चालकावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अगदी बॉलिवूडच्या 'एतराज' या चित्रपटाला साजेशी ही घटना आहे.
ऑटो चालकाचे नाव उमेश प्रसाद (वय 42) असे तर तरुणीचे नाव रेनू लालवानी असे आहे. रेनूने दिल्लीच्या साकेत येथून अर्जुननगरला जाण्यासाठी उमेश यांचा रिक्षा भाड्याने केला होता. अर्जुननगरला आल्यावर रेनूने त्याला भाडे घेण्यासाठी घरात बोलवले. प्यायला पाणी दिले. त्यानंतर घराची सगळी दारे लावून घेतली. त्याला याचा धक्का बसला. त्याने विचारणा केल्यावर रेणूने सेक्स करण्याची इच्छा बोलून दाखवली. पण त्याने स्वष्ट शब्दांत नकार दिला.
ड्रिंक केल्यावर त्याचा निर्णय बदलेल असे तिला वाटले. तिने त्याच्यासाठी वाईनचे पेग तयार केला. पण त्याने वाईन घेतली नाही. त्याच्या नकाराने रागावलेल्या रेणूने त्याला ठिकठिकाणी किस करण्यास सुरवात केली. त्याचे कपडे फाडले. यावेळी तिची रुममेट हितीजा आली. तिने या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरवात केली.
आता आपले काही खरे नाही, याची ऑटो चालकाला जाणीव झाली. त्याने इमारतीच्या बाल्कनीतून खाली उडी मारली. यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यानंतर त्याने पोलिस तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघींना अटक केली आहे. त्यांच्या घरी त्याचे ड्रायव्हिंग लायसन्सही सापडले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, या ऑटो चालकावर झाला बलात्काराचा प्रयत्न.... पोलिसांनी या तरुणींना केली अटक....