आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Tyagi\'s Bank Account Sealed In Case Of Helecopter Deal

हेलिकॉप्टर सौद्यातील लाच प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख त्यागींचे खाते सील

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदी करारात लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने मंगळवारी हवाई दलाचे माजी प्रमुख एस.पी. त्यागी यांचे बँक खाते गोठवले आहे. इतर आरोपींची खातीही गोठवण्यात आली आहेत.


व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर खरेदीचा हा 3600 कोटींचा करार आहे. करारासाठी लाच घेतल्याचा अनेक भारतीयांवर आरोप आहे. एरोमॅट्रिक्स इन्फो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, आयडीएस इन्फोटेक या भारतीय कंपन्यांवर लाचखोरीचा आरोप आहे. त्यागी यांची चुलत भावंडे संजीव ऊर्फ ज्युली, राजीव ऊर्फ डोक्सा व संदीप यांच्या खात्यावरील व्यवहारही बंद करण्यात आला आहे. एखाद्या करारात आरोपी म्हणून माजी हवाईदलप्रमुखाचे नाव येण्याची ही पहिलीच वेळ आहे.