आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • U.S. Seen As Biggest Oil Producer After Overtaking Saudi

कच्चे तेल उत्पादनात अमेरिका सर्वात पुढे, भारत बनला सर्वात जास्त ऊर्जा खर्च करणारा देश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सौदीअरेबियाला मागे टाकत अमेरिका कच्चे तेल उत्पादनात जगातील सर्वात मोठा देश बनला आहे, तर इतर मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांना मागे टाकत भारत जगातील सर्वात मोठा ऊर्जा लागणारा देश बनला आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीतून हे समोर आले आहे.
तेल कंपनी बीपीच्या "वर्ल्ड एनर्जी रिपोर्ट' आकडेवारीत अमेरिकेने २०१४ मध्ये दररोज १.१६ कोटी बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन केले, तर याच कालावधीत सौदी अरेबियामधील प्रतिदिन उत्पादन १.१५ कोटी बॅरल होते. तिसऱ्या स्थानावर रशियामध्ये १.०८ कोटी बॅरल प्रतिदिन उत्पादन घेण्यात आले.

चीनमधील विक्री कमी
बीपीच्याअहवालानुसार चीनमधील विक्री १९९८ नंतर प्रथमच खालच्या पातळीवर आली आहे. ऊर्जेच्या बाबतीत भारतात ७.१ टक्के वाढ झाली आहे. मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये ही सर्वात मोठी वाढ आहे. भारतातील तेल उत्पादनात १.३ टक्के घट झाली आहे. देशात दररोज ८.९५ लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होते.

किमती वाढल्या
अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या साठ्यात घट झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल महाग झाले आहे. यात १.४८ डॉलरची वाढ झाली आहे, तर अमेरिकेत कच्च्या तेलाच्या भावात देखील १.३६ डॉलरची वाढ झाली आहे. अमेरिकन पेट्रोलियम इन्स्टिट्यूटच्या वतीने मंगळवारी आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार आठवड्यात कच्च्या तेलाच्या साठ्यात ६७ लाख बॅरलची घट झाली आहे.