आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दाऊदच्या संपत्तीवर UAE सरकारने आणली टाच, भारताने सोपवली होती यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीवर दुबईमधील संपत्तीवर यूएई सरकारने टाच आणली आहे. यूएई सरकारने गेल्या आठवड्यापासून दुबईमधील दाऊदची संपत्ती जप्त करण्याचे काम सुरु केले आहे. याची माहिती सरकारमधील अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यूएई दौरा केला होता त्यावेळी त्यांनी दाऊद विरोधातील कारवाईचा करार केला होता. त्यावेळी पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोभाल यांनी एक यादी सोपवली होती.
यूएईमध्ये दाऊदची किती संपत्ती
यूएईमध्ये दाऊदची जवळपास 5 हजार कोटींची संपत्ती आहे. तपास यंत्रणांनी दाऊदच्या 50 हुन अधिक मालमत्तांची ओळख पटवली आहे. यूएई सरकारने कारवाईसाठी एक तपास यंत्रणा स्थापन केली आहे. पंतप्रधान मोदी 16 ऑगस्ट रोजी दोन दिवसांच्या यूएई दौऱ्यावर गेले होते. यावेळी यूएई सरकारने दहशतवाद्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. तेव्हापासूनच दुबईमध्ये दाऊदवर निर्बंध येण्याची शक्यता निर्माण झाली होती.
भारताने कोणते पुरावे दिले ?
पंतप्रधानांच्या यूएई दौऱ्यात भारताने दाऊदच्या आवाजाचे नमुने त्यासोबत त्याच्या यूएईमधील ठिकाण्यांची माहिती दिली होती.त्यात त्याच्या तीन रिअल इस्टेट कंपनी आणि मनी एक्सचेंज फर्म यांची कागदपत्रे होती. प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) दाऊदचे ड्रग्ज, बेटिंग, बेकायदेशीर व्यवहार, मनी एक्सचेंज फर्म चालवण्याचे पुरावे सोपवले होते. दाऊदच्या प्रत्येक धंद्याची अखेरची देवघेव दुबईमधून होते, याची माहिती देण्यात आली होती. दुबईमधील पाकिस्तानी बिझनेसमॅन जावेदसोबत झालेली त्याची बातचीत आणि त्यासंबंधीच्या डिटेल्स यूएई सरकारला सोपवण्यात आल्या होत्या. या संभाषणात दाऊदने यूएई मधील सहकाऱ्यांची नावे घेतली होती.