आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिरातीची मदत; ५३.३ कोटी टन तेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) यांच्यात द्विपक्षीय संबंध आणखी बळकट करणारे सात करार झाले आहेत. दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, ऊर्जा क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यावर सहमती झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि यूएईचे सशस्त्र सेनेचे उपमुख्य कमांडर जनरल शेख मोहंमद बिन झायेद अल नाहयान यांच्यातील चर्चेत या समझोत्यांवर सहमती झाली आहे. नाहयान अबुधाबीचे युवराज आहेत. दहशतवाद हा दोन्ही देशांसाठी धोका असून उभय देशांनी एकत्र येऊन या समस्येच्या विरोधात लढण्याचा िनर्णय घेतला आहे. यूएईने भारताला पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करणे. सामरिक पातळीवर तेल भांडार समृद्ध करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. विशाखापट्टणम, मंगलूर ,पादूरमध्ये ५३.३ कोटी टन कच्चे तेल भूमिगत साठ्यात ठेवले जाईल.