आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uber Cab Rape Victim Breaks Her Silence Says Delhi Failed Her

दिल्लीने मला उद्‍ध्वस्त केले; \'उबर\' बलात्कारकांडातील पीडितेने सोडले मौन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत उबर टॅक्सीच्या चालकाने एका तरुणीवर केलेल्या बलात्कार केल्याच्या घटनेला अजून एक महिनाही उलटलेला नाही. मात्र, टॅक्सी पुन्हा एकदा रस्त्यावर धावताना दिसत आहेत. दुसरीकडे, घटनेतील पीडितेने मौन सोडले आहे. दिल्लीने मला Fail अर्थात उद्‍ध्वस्त केल्याचे पीडितेने म्हटले आहे.
एक इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना पी‍डितेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. निर्भया बलात्काराविरोधातील आंदोलनात म‍ित्रासोबत आपणही रस्त्यावर उतरल्याचे पीडितेने सांगितले. मात्र, या क्रुर घटनेने तिचीही अवस्था निर्भयासारखीच झाली आहे. दिल्लीने आपले आयुष्य उद्‍ध्वस्त केल्याचे पीडितेने यावेळी म्हटले.

'उबर' विश्वासघात केला....
पीडितेने सांगितले की, घटना घडली त्या दिवशी दिल्ली असुरक्षित दिसत होती. मात्र, उबर टॅक्सी सेवावर माझा विश्वास होता. कारण 'उबरची सेवा मी अनेकदा घेतली होती. त्या दिवशी डिनर झाल्यानंतर मित्रांना त्रास नको म्हणून मी घरी जाण्यासाठी उबर टॅक्सी बोलावून घेतली होती. मा‍‍त्र, उबरच्या चालकाने माझ्यावर अत्याचार केला. हवसचे शिकार केले. त्यामुळे माझ्यासह माझ्या कुटुंबीयांचे अकल्पनीय नुकसान झाले आहे. उबरच्या चालकाने बॅचदेखील लावला नव्हता.
दोन वर्षांपूर्वी निर्भयाकांडनंतर मी अनेक प्रोटेस्टमध्ये सहभाग घेतला होता. मित्रांसोबत बलात्काराविरोधात आ‌वाज उठवला होता. मात्र, माझ्यासोबत जे झाले त्याची भरपाई कधीच होऊ शकत नाही. या एका घटनेने माझे आयुष्य उद्‍ध्वस्त झाले आहे. माझे मानसिक खच्चीकरण झाले आहे. आत्मविश्वास डगमगला आहे. एकटीला घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
शाळा आणि महाविद्यालयाच्या दिवसात पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत असल्याचे पीडितेने सांगितले. मात्र, कधीच लैंगिक शोषणाच्या घटना घडली नव्हती. अन्यायाविरोधात आवाज उठवणे शाळेत शिकवण्यात आले होते.

पीडितेने सांगितले की, त्या रात्री घटना घडल्यानंतर तिने आधी पोलिसांना माहिती दिली. नंतर आपल्या कुटुंबीयांना आपबिती कथन केली. निर्भयाकांडानंतर देशात महिलांच्या सुरक्षितेबाबत सरकार ठोस पाऊल उचलेल, अशी अपेक्षा होती. मात्र, समाजातील मानसिकतेत काहीच बदल झाला नाही.