आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uber India Taxi Case Delhi High Court Lift Ban On Uber Taxi In Delhi

दिल्ली सरकारला झटका,उबेर टॅक्सीला दिलासा, हायकोर्टाने उठवली बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली हायकोर्टाने आज (बुधवार) दिल्ली सरकारला जबरदस्त झटका दिला आहे. दिल्ली सरकारची राजधानीत टॅक्सी सेवा देणारी 'उबेर इंडिया'च्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे 'उबेर'ला पुन्हा परवाना मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उबेर इंडियाला हायकोर्टाने दिलासा दिला असला तरी त्यांच्याकडे रेडिओ टॅक्सीचा परवाना नाही. त्यामुळे दिल्लीत त्यांना कायदेशिररित्या सेवा देता येणार नसल्याचेही कोर्टाने म्हटले आहे. दुसरीकडे, दिल्लीत सध्या उबेर सेवा सुरु असून वाहतूक पोलिस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत.

हायकोर्टाने उबेरला दिली होती ताकीद...
उबेर इंडियाकडे परवाना नसल्यामुळे त्यांना दिल्लीत सेवा देता येणार नाही. असे 8 जूनला झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने उबरला ताकीद दिली होती. त्यावर उबेरने दिल्ली सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दा खल केली होती. परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला होता.परंतु, आपला अर्ज दिल्ली सरकारने रद्द केल्याचे उबेरने याचिकेत म्हटले होते.
दुसरीकडे, उबेर इंडिया रेडिओ टॅक्सी स्कीम 2006 च्या संशोधित नियमांचे पालन करत नसल्याने दिल्ली सरकारने कोर्टात स्पष्टीकरण दिले होते.

उबेर करणार पाच कोटी डॉलर्सची गुंतवणूक
आंतरराष्ट्रीय परिवहन नेटवर्क कंपनी 'उबेर'ने हैदराबादमध्ये पाच कोटी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. हैदराबादमध्ये उबेरने आपले भव्य कार्यालय प्रस्थापित करणार आहे. अमेरिकेबाहेरील हे सर्वात मोठे केंद्र असेल. पुढील पाच वर्षात उबेरचे हे कार्यालय तयार होणार असून त्यात हजारों कर्मचारी काम करतील, असे सूत्रांनी सांगितले आहे.