आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Uber Rape Case : Delhi Court Will Pronounce Judgment In 2 Days

उबर कॅब बलात्कार प्रकरणी ड्रायव्हर दोषी, शिक्षेबाबत दोन दिवसांनी युक्तीवाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - पोलिसांच्या ताब्यातील आरोपी शिवकुमार यादव - Divya Marathi
फाइल फोटो - पोलिसांच्या ताब्यातील आरोपी शिवकुमार यादव
नवी दिल्ली - उबेर रेप केसमध्ये दिल्लीच्या तीस हजारी फास्ट ट्रॅक कोर्टाने ड्रायव्हरला दोषी करार दिला आहे. गुडगावच्या एक कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये उबेरमधून घरी परतताना ड्रायव्हर शिवकुमार यादव याने बलात्कार केला होता. त्याच्या शिक्षेवर 23 ऑक्टोबरला युक्तीवाद होणार आहे. या घटनेनंतर उबेर कॅबमध्ये सेफ्टीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

प्रकरण काय?
गेल्या वर्षी 5 डिसेंबरला एका तरुणीने अॅपच्या माध्यमातून कॅब बूक केली होती. ती वसंत विहारमधून नॉर्थ दिल्लीच्या इंद्रलोक परिसरात असलेल्या तिच्या घरी येत होती. त्यावेळी रस्त्यात कॅब ड्रायव्हर शिवने मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर होता. या घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली होती.

केव्हा काय झाले?
> पोलिसांनी या प्रकरणी 6 डिसेंबरला एफआयआर दाखल केला होता.
> 24 डिसेंबरला कोर्टात चार्डशीट दाखल करण्यात आली. 7 जानेवारी 2015 रोजी फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणी सुनावणी सुरू झाली.
> 13 जानेवारीला आरोपीवर बलात्कार, अपहरण, जीवे मारण्याचा प्रयत्न यासह इतर कलमान्वये गुन्ह्य दाखल करण्यात आला.
> पोलिसांनी 31 जानेवारीला या प्रकरणात 28 साक्षीदारांचे जबाब नोंदवणे पूर्ण केले.
> या प्रकरणात सर्वात मोठे वळण आरोपी शिव कुमार यादवच्या वकिलांनी 28 लोकांचा परत जबाब नोंदवण्यासाठी कोर्टात अर्ज केला त्यावेळी आले.
> हायकोर्टाने 4 मार्च 2015 रोजी 14 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्याची परवानगी दिली होती.
> या निर्णयाच्या विरोधात दिल्ली पोलिस आणि पीडितेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 10 मार्च रोजी सुप्रीम कोर्टाने खालच्या कोर्टातील सुनावणीवर बंदी घातली.
> सुप्रीम कोर्टाने 10 सप्टेंबरच्या निर्णयात दिल्ली हायकोर्टाने दिलेला निर्णय रद्द केला. सुप्रीम कोर्टाने ट्रायल कोर्टाला लवकर या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.