आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रफुल्ल पटेल यांच्या ‘उडान’ या आत्मचरित्राचे राष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या “उडान - ए ग्राफिक ग्लिम्प्स थ्रू द लाइफ ऑफ प्रफुल्ल पटेल’ या आत्मचरित्राचे प्रकाशन साेमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले.  

राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमास पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल, केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा,  भाजपचे खा. राजीवप्रताप रूडी, क्रीडामंत्री विजय गोयल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खा. शरद पवार, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खा. आनंद शर्मा, जदयूचे महासचिव के. सी. त्यागी, माकपचे सीताराम येचुरी, ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा,  रंजन भट्टाचार्य आणि उद्योजक व भारती एंटरप्रायजेसचे चेअरमन सुनील भारती मित्तल, भारती एंटरप्रायजेसचे एम. डी. राजन भारती मित्तल, वेदांता फाउंडेशनचे चेअरमन अनिल अग्रवाल आदी प्रमुख मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित प्रमुख वक्त्यांनी प्रफुल्ल पटेल यांचे खेळाविषयी असलेले प्रेम आणि या क्षेत्रात त्यांनी केलेल्या राजकीय योगदानाचे कौतुक केले.

राज्यसभेचे खासदार आणि अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांचे चरित्र ‘उडान- ए ग्राफिक ग्लिम्प्स थ्रू द लाइफ ऑफ प्रफुल्ल पटेल’चे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी पटेल यांच्या पत्नी वर्षा पटेल, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गुलाम नबी आझाद  आदींची उपस्थिती होती.
बातम्या आणखी आहेत...