आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरींनी पाहिला \'उडता पंजाब\', ट्विटरवर म्हणाले- बादलांनी पाहिला पाहिजे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केजरीवालांनी उडता पंजाब पाहिल्यानंतर बादल सरकारवर निशाणा साधला आहे. - Divya Marathi
केजरीवालांनी उडता पंजाब पाहिल्यानंतर बादल सरकारवर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उडता पंजाब पाहिल्यानंतर त्याचे तोंडभरून कौतूक केले आहे. त्यासोबतच केजरीवालांनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'बादल यांनी हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे. त्यांनी पाहिले पाहिजे पंजाबची काय स्थिती झाली आहे.'

ट्विटरवर दिली प्रतिक्रिया
- केजरीवाल यांनी ट्विट केले, 'आता उडता पंजाब पाहिला, अतिशय पॉवरफूल आहे. उडता पंजाब दाखवतो की राजकारणी कसे ड्रग्स रॅकेट चालवतात. निवडणुकीच्या वेळी फुकटात ड्रग्स वाटले जाते. पंजाबला बिघडवून टाकले आहे.'
- पुढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक आहे. या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने मोठी तयारी केली आहे. त्यांनी राज्यातील व्यसनाधिनता आणि नशेचा उद्योग मुख्य मुद्दा केला आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, केजरींचे ट्विट आणि प्रमोशनसाठी एकत्र आले शाहिद-करिना.