आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ugandan Woman Said Somnath Bharti Led The People Who Attacked Them

पोलिस अधिकारी गेले आता भारतींना सुटीवर पाठवा, आमदार बिन्नींची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. 'आप'चे आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी म्हटले आहे, की दिल्ली पोलिसांची सुटी झाली आहे. आता, केजरीवाल यांनी सोमनाथ भारतींना सुटीवर पाठवावे. 'आप'चे सदस्य कॅप्टन गोपीनाथ यांनीदेखील भारतींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. दुसरीकडे 'आप'चे समर्थक दोन दिवसांच्या आंदोलनावर टीका करत आहेत. प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी 'आप'ला राजकारणातील 'आयटम गर्ल' म्हटले आहे.
कायदा मंत्री सोमनाथ भारती एकिकडे स्वपक्षीयांचे आरोप झेलत आहेत, तर दुसरीकडे कायद्याच्याही कचाट्यात आले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून एका अफ्रिकन महिलेने छायाचित्राच्या आधारावर त्यांना ओळखले आहे. तिचे म्हणणे आहे, की सोमनाथ भारती यांच्या नेतृत्वातील जमावानेच महिलांसोबत गैरकृत्य केले होते.
दिल्लीच्या मालवीय नगर येथील कथित सेक्स रॅकेट चालवणा-यांच्या विरोधात सोमनाथ भारती यांच्या आदेशावरुन कारवाई न करणा-या पोलिस अधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 38 तास धरणे दिले होते. मालवीय नगरचे एसएचओ आणि पहाडगंज येथील पोलिस कर्मचा-याला सुटीवर पाठवण्याच्या आश्वासनानंतर केजरीवाल यांनी धरणे आंदोलन मागे घेतले. मात्र, कायदा मंत्र्यांचा 'आप' बचाव करीत आहे. दिल्लीचे सहकार मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले, भारतींनी पोलिसांना दिलेला कारवाईचा आदेश योग्य होता.

पुढील स्लाइडमध्ये, 'आप' राजकारणातील 'आयटम गर्ल'