आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युगांडाच्या महिलांची दिल्ली सरकारकडे तक्रार, सेक्स रॅकेटपासून वाचवण्याची विनंती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या खिडकी एक्सटेंशन येथील रहिवासी असलेल्या युगांडाच्या तीन महिलांनी खळबळजनक खुलासा केला आहे. त्यांचा आरोप आहे, की त्यांना बळजबरीने देहव्यापाराच्या दलदलीत ढकलेले जात आहे. या प्रकरणी त्यांनी सोमवारी दिल्ली सरकारकडे फिर्याद केली आहे. त्यांनी दक्षिण दिल्लीच्या पोलिस उपायुक्त (डीसी) कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. तिन्ही महिलांनी एका एनजीओच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. सोमवारी दुपारी दोन वाजता त्या कार्यालयात आल्या. त्यांचा आरोप आहे, की खिडकी एक्सटेंशनचे काही लोक त्यांच्यावर वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करीत आहेत.
सुत्रांच्या माहितीनुसार, युगांडाच्या तीन महिलांनी दिल्ली सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे. एनजीओने परराष्ट्र मंत्रालयाकडेही या महिलांच्या सुरक्षीततेची मागणी केली आहे. मात्र, अद्याप या प्रकरणी एफआयआर दाखल झालेला नाही. डीसीने संबंधीत पोलिस स्टेशनच्या एसएचओला तापसाचे आदेश दिले आहेत. डीसीचे म्हणणे आहे, की प्रथम तिन्ही महिलांच्या तक्रारीची सत्यता पडताळून पाहिली जाईल, त्यानंतर एफआयआर दाखल केला जाईल. त्यांनी दिलेल्या तक्रारीवर तपास सुरु झाला असून आरोपींची ओळख पटल्यानंतर त्यांना अटक केली जाईल.
दिल्ली सरकारकडे तक्रार करणा-या खिडकी एक्सटेंशन येथील या त्याच महिला आहेत, ज्यांच्या घरावर काही दिवसांपूर्वी दिल्लीचे कायदा मंत्री सोमनाथ भारती यांनी छापा टाकला होता, आणि त्या देहव्यापार करीत असल्याचा आरोप करुन दिल्ली पोलिसांना त्यांच्यावर कारवाई करण्यास सांगितले होते. याप्रकरणी युगांडाच्या दोन महिलांनी सोमनाथ भारती यांच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. कायदा मंत्री भारती त्यांच्या साथीदारांसह मध्यरात्री आमच्या घरात घुसले आणि त्यांनी आम्हाला भारत सोडून जाण्यास सांगितले अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप या महिलांनी केला होता. युगांडाच्या एका महिलेने कोर्टामध्ये सोमनाथ भारतींना ओळखले होते.