आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UGC President Order To All VCs Of Principles Appointment

प्राध्यापकांची पदे भरा, अन्यथा अनुदान थांबेल, यूजीसी अध्यक्षांचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाविद्यालये व विद्यापीठांमधील प्राध्यापकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरा अन्यथा आगामी शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयांना दिले जाणारे अनुदान थांबवण्यात येईल, असा इशारा विद्यापीठ अनुदान आयोगाने दिला आहे. प्राध्यापकांची रिक्त पदे भरताना आरक्षण व इतर नियमांचे पालन करावे, असेही यूजीसीने म्हटले आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष प्रो. वेदप्रकाश यांनी देशभरातील विद्यापीठांच्या कुलगुरुंना पत्र पाठवून यासंदर्भात निर्देश दिले आहेत. विद्यापीठ व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी यूजीसीवर त्यांचे अनुदान रोखण्याची वेळ आणू नये, असे अध्यक्षांनी पत्रात म्हटले आहे. विद्यापीठांमध्ये रिक्त असलेली लेक्चरर्सची पदे भरताना ती तात्पुरत्या पद्धतीने, करार अथवा अंशकालीन पद्धतीने भरली जातात. प्राध्यापकांची नियुक्ती ही अस्थायी असल्याने मुदत संपल्यानंतर त्यांचा करारही संपुष्टात येतो. असे प्राध्यापक नियमित नियुक्त्यांसाठी अपात्र ठरतात. तसेच त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवरही परिणाम होतो.
यूजीसीचा भर हा गुणवत्ता सुधारणेवर असल्यामुळे महाविद्यालयांनी पदे भरताना नियमांचे पालन करावे.

संसाधने उपलब्ध करून देण्यास यूजीसी बांधील
वेदप्रकाश यांनी कुलगुरुंना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्यासाठी अकॅडमिक व व्यावसायिक दृष्टिकोनातून योग्य व्यक्तींची निवड करण्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी यूजीसीने त्यांना संसाधन उपलब्ध करून देण्यासाठीची बांधिलकी कधीच नाकारलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता व निकषांच्या दृष्टिकोनातून विद्यापीठांनी रिक्त पदे भरून दर्जा सुधारणेसाठी विनाविलंब प्रयत्न करून आपली बांधिलकी दाखवून दिली पाहिजे.