आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

210 सरकारी वेबसाईटवरुन आधार डेटा लीक ; यूआयडीएआयने RTI द्वारे दिलेले उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यूआयडीएआयने हे सांगितलेले नाही की ही माहिती कधी लिक झाली. (सांकेतिक फोटो) - Divya Marathi
यूआयडीएआयने हे सांगितलेले नाही की ही माहिती कधी लिक झाली. (सांकेतिक फोटो)

नवी दिल्ली- यूआयडीएआयने 200 पेक्षा जास्त सरकारी वेबसाईटद्वारे आधारी संबंधित माहिती लीक झाल्याचे मान्य केले आहे. माहिती अधिकार कार्यकर्त्याने याबाबत विचारलेल्या प्रश्नावर यूआयडीआयने हे उत्तर दिले आहे.

 

 

आधारच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

यूआयडीएआयने देशातील प्रत्येक नागरिकाला दिलेल्या 12 अंकी क्रमांकाद्वारे त्याची ओळख, आणि त्याच्या निवासाची माहिती मिळते. सध्या केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड देणं बंधनकारक करण्यात येत आहे. त्यातच सरकारी वेबसाईटद्वारे आधारवरील माहिती लीक होत असल्याने, आधारच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 

 

यूआयडीएआयने केल्या काय उपाययोजना

आरटीआयला दिलेल्या उत्तरात यूआयडीएआयने सांगितलंय की, “अनेक शैक्षणिक संस्थांसह, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागातील एकूण 210 वेबसाईटवरील व्यक्तींची नावं, त्याचे पत्ते आणि इतर माहिती, आधार क्रमांक, सर्वसमान्यांसाठी सार्वजानिक करण्यात आली आहे.” पण यावरील आधारशी संबंधित माहिती तत्काळ हटवण्यात आली असल्याचेही यूआयडीएआयने स्पष्ट केले आहे.

 

 

आरटीआयला दिलेल्या उत्तरात पुढे म्हटलंय की, “यूआयडीएआयची सिस्टिम अशाप्रकारे बनवण्यात आली आहे आहे, ज्याद्वारे व्यक्तीची माहिती सुरक्षित ठेवली जाऊ शकेल. आणि आधार प्रणालीचा हाच महत्त्वाचा भाग आहे. यावरील माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी सर्वतोपरी महत्त्वाच्या उपाययोजना वेळच्या वेळी करण्यात आल्या आहेत.”

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

 

बातम्या आणखी आहेत...