आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • UK Health Regulator Withdraws Certification Of Wockhardt Unit

वोक्हार्टच्या चिकलठाणा निर्मिती प्रकल्पाच्या प्रमाणपत्रावर इंग्लंडची टाच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - वोक्हार्टच्या औरंगाबादेतील चिकलठाणा प्रकल्पाचे निर्मिती प्रमाणपत्र इंग्लंडच्या औषधी व आरोग्यविषयक उत्पादने नियामक एजन्सीने (यूकेएमएचआरए) रद्द केले आहे. अमेरिकेच्या औषधी प्रशासनाकडून कंपनीच्या वाळूज प्रकल्पाबाबत आक्षेप घेण्यात आले होते. त्यापाठोपाठ वोक्हार्ट बसलेला हा दुसरा मोठा धक्का आहे.
वोक्हार्ट कंपनीने शनिवारी मुंबई शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार वोक्हार्टच्या एल-1, एमआयडीसी, चिकलठाणा येथील प्रकल्पाचे औषधी निर्मिती प्रमाणपत्र (जीएमपी) रद्द करण्याचा निर्णय यूकेएमएचआरएने घेतला आहे. या प्रकल्पासाठी आता मर्यादित उत्पादनाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. या बाबीचा कंपनीवर नेमका काय परिणाम होईल ते तूर्तास सांगता येणार नसल्याचे वोक्हार्टने स्पष्ट केले. आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि पर्याय नसणार्‍या औषधांच्या निर्मितीवर मात्र याचा परिणाम होणार नसून चिकलठाणा प्रकल्पातून त्याचे उत्पादन सुरू राहील, असे वोक्हार्टने म्हटले आहे.

दुसरा धक्का : अमेरिकेच्या अन्न व औषधी प्रशासनाने (यूएसएफडीए) मे महिन्यात वोक्हार्टच्या वाळूज येथील प्रकल्पावर आयात सतर्कतेचा इशारा जारी केला होता. त्यानंतर जुलैमध्ये यूकेएमएचआरएने वोक्हार्टच्या वाळूज येथील याच प्रकल्पावर तसाच इशारा जारी करत येथे निर्मित 16 औषधांवर प्रतिबंधित रिकॉल जाहीर केला होता. वाळूज प्रकल्पाबाबत योग्य काळजी घेण्यात येत असल्याचे वोक्हार्टने स्पष्ट केले.