आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’ राष्ट्रपती राजवटीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात, नायब राज्यपालांच्या शिफारशीला आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या नायब राज्यपालांच्या शिफारशीला आम आदमी पार्टीकडून सर्वाच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि इतर काँग्रेस नेत्यांचा बचाव करण्यासाठी ही शिफारस करण्यात आली आहे, असा आरोप ‘आप ’ ने केला आहे. दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस 16 फेब्रुवारीला करण्यात आली होती. ‘आप’ च्या म्हणण्यानुसार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अरविंद केजरीवाल सरकारने दाखल केलेल्या एफआयआरनंतरच्या कारवाईवर यामुळे परिणाम होऊ शकतो. हा निर्णय मनमानी पद्धतीने करण्यात आला आहे आणि तो बेकायदा आहे. राष्ट्रपती राजवट म्हणजे दिल्लीतील नागरिकांच्या हक्काचे उल्लंघन आहे. त्याचबरोबर घटनेच्या कलम 14 ची देखील पायमल्ली आहे. दरम्यान, भाजप आणि काँग्रेस सरकार स्थापनेच्या स्थितीमध्ये नाहीत. दोन्ही पक्षांनी केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर तसे स्पष्ट केले होते.