आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साईबाबांनी स्वत:ला देव म्हणवून घेतले काय;उमा भारतींची वादात उडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/अलाहाबाद - केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी साईबाबांच्या पूजेअर्चेचे सर्मथन केले आहे. साईबाबांनी स्वत:ला कधी देव म्हणवून घेतले होते काय, असा सवाल त्यांनी द्वारका व ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद यांना केला.

हिंदूंनी साईबाबांची पूजा करू नये, असे शंकराचार्यांनी म्हटले होते. यावर उमा म्हणाल्या, साईबाबांनी स्वत: देव असल्याचे कधी म्हटले होते काय? भक्तांनीही कधी त्यांना 25 वा अवतार जाहीर करा, असे म्हटले नव्हते. साईंना आम्ही देव मानतो एवढेच ते म्हणतात. श्रद्धेपोटी आपण मातापिता, अतिथी व गुरूलाही देव मानतो, असे त्या म्हणाल्या. साईंच्या दरबारात अनेकांनी साकडे घातले आणि त्यांची संकटे दूर झाली आहेत, असेही उमा म्हणाल्या.

साईमूर्ती हटवणार : अलाहाबादच्या महिला आखाड्याने साईमूर्तीला विरोध चालवला असून, मंदिर व्यवस्थापनाशी साध्वी चर्चा करणार आहेत. मूर्तींची प्रतिष्ठापना करू नका, अशी लोकांची समजूत त्या काढतील. असे आखाड्याच्या प्रमुख त्रिकाल भवंता यांनी सांगितले.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)