आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओमर अब्दुल्लांच्या एक्स वाइफचे सामान दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने काढले बंगल्याबाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची एक्स वाइफ पायल यांच्याकडून दिल्ली पोलिसांनी जबरदस्तीने सरकारी बंगला खाली करून घेतला. गेट तोडून सरकारी अधिकार्‍यांनी बंगल्यात प्रवेश केला आणि त्यांचा सामान घराबाहेर काढला.

दरम्यान, दिल्ली हायकोर्टाने पायल अब्दुल्ला यांनी सन्मानपूर्वक सरकारी बंगला सोडावा, असे आदेश दिले होते. आपल्या दोन मुलांंसोबत त्या दिल्लीतील सरकारी बंगल्यात राहत होत्या. “तुम्ही सन्मानपूर्वक बंगला खाली करणार की नाही ? की आम्ही आदेश काढावा ?’ असे न्यायमूर्ती इंदरमित कौर यांनी सुनावणीदरम्यान त्यांना विचारले होते. निवृत्तीनंतर प्रत्येक व्यक्तीला सरकारी कार्यालय सोडावे लागते. त्याचप्रमाणे सरकारी बंंगलाही सोडावा लागत असतो.

दुसरीकडे, दिल्ली पोलिस पायल त्यांच्या मुलांना 94 सुरक्षा रक्षकांंची झेड प्लस सुरक्षा पुरवतील. दिल्लीत असताना त्यांना ही सुरक्षा दिली जाईल, असे कोर्टाने स्पष्ट केले. 16 ऑगस्ट राेजी झालेल्या सुनावणीतही कोर्टाने पायल यांना निवासस्थान सोडण्यास सांगितले. 1999 पासून पायल 7, अकबर रोड येथील बंगल्यात राहतात. हा बंगला सोडण्यास त्यांनी नकार दिला आहे. माझ्या कुटुंबाच्या जीविताला धोका असल्याने तूर्त बंगला सोडू शकत नाही. सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात यावी, अशी विनंती पायल यांनी कोर्टाकडे केली होती. परंतु, सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी बंगला ताब्यात ठेवता येऊ शकत नाही, असे सांगून केंद्र सरकारने पायल यांची सुरक्षिततेची सबब नाकारली होती. कारण पायल यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विषय दिल्ली पोलिसांच्या अखत्यारीतील आहे. दिल्ली पोलिस त्यांची सुरक्षा करतील. त्यात काहीही कपात करण्यात आलेली नाही, असे केंद्राचे वकील अनुराग अहलुवालिया यांनी सांगितले. प्रियंका गांधी, सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह अनेक नेत्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी बंगल्यात राहण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, याकडे पायल यांनी याचिकेद्वारे लक्ष वेधले आहे.

सुरक्षेवरून वाद
पायल अब्दुल्ला यांच्या सुरक्षेवरून वाद आहे. काश्मीरच्या तुलनेत दिल्लीत त्यांना किंवा कुटुंबीयांना फार काही धोका असल्याचे दिसून येत नाही. तशा प्रकारची गोपनीय माहितीदेखील उपलब्ध नाही, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.

बंगला ताब्यात घ्यावा : ओेमर अब्दुल्ला
अनेक वर्षांपासून मी बंगल्यात राहत नाही. त्यामुळे प्रशासनाने बंगला परिसर ताब्यात घ्यायला हवा, असे ओेमर अब्दुल्ला यांच्या वतीने सांगण्यात आले.

मुख्यमंत्री बनल्यानंतरही भेटत होते ओमर...
पायल यांचा दिल्लीत ट्रान्सपोर्टचा बिझनेस आहे. ओमर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनल्यानंतर प्रत्येक रविवारी पायल व मुलांना भेटण्यासाठी जात होते. दोघांच्या विवाहामुळे काश्मीरी पंडित नाराज होते. ‍विवाहानंतर पायल यांनी जम्मू काश्मीर सोडून दिल्लीत राहाणे पसंत केले होते.

दोघे झाले विभक्त...
- 2011 मध्ये पायल व ओमर विभक्त झाले. ओमर यांनी हे स्वत: जाहीर केले होते.
- दोघांना दोन मुले आहेत. (जाहिर आणि जमीर)
- घटस्फोटानंतर पायल दोन्ही मुलांसोबत दिल्लीत राहातात.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सरकारी बंंगला खाली करतानाचे फोटोज...

(Pls Note-
तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...