आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमर खालिद, अनिर्बानला जामीन, देशविरोधी घोषणा दिल्याचा आहे आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जेएनयू परिसरात देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप असलेले उमर खालिद व अनिर्बान भट्टाचार्य यांना दिल्ली न्यायालयाने ६ महिन्यांचा सशर्त अंतरिम जामीन दिला.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंह यांनी दोघांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला. २३ फेब्रुवारीपासून उमर व अनिर्बान तुरुंगात होते. यापूर्वी जेएनयू विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैया याच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने त्याला सहा महिन्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला होता. त्याच आधारे उमर व अनिर्बान यांनाही जामीन मंजूर झाला आहे.
जेएनयूतील एका कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी दिल्याचा काही विद्यार्थ्यांवर आरोप होता. यात कन्हैय्या कुमार, अनिर्बान व उमर खालिदसह अन्य काही विद्यार्थी होते. कन्हैयास अटक झाल्यानंतर २३-२४ फेब्रुवारीच्या रात्री अनिर्बान व उमर यांनी शरणागती पत्करली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते.

विद्यापीठाचा ठपका
जेएनयूमध्ये ९ फेब्रुवारीच्या घटनेच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने स्थापन केलेल्या पाचसदस्यीय चौकशी समितीने दिलेल्या अहवालात खालिद आणि अनिर्बानने बाहेरच्या लोकांना विद्यापीठ परिसरात प्रवेशासाठी मदत केली होती. या लोकांनीच देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, असे नमूद आहे.