आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • JNU Rusticates Umar Khalid, Anirban Bhattacharya; Kanhaiya Fined Rs 10000

कन्हैयाला 10 हजारांचा दंड, खालिद निलंबित; जेएनयूने केली कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अतिरेकी अफझल गुरूच्या मृत्युदिनी ९ फेब्रुवारीला घोषणाबाजी केल्याच्या प्रकरणात शिस्तभंग केल्याप्रकरणी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैयाकुमारला १० हजार रुपये दंड ठोठावला आहे. दुसरा विद्यार्थी उमर खालिदला २० हजारांचा दंड आणि एक सत्रासाठी निलंबित करण्यात आले अाहे. आशुतोषकुमारला हॉस्टेलमधून वर्षभरासाठी काढून टाकण्यासह २० हजारांचा दंड व अनिर्बान भट्टाचार्यला १५ जुलैपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. तसेच तो पुढील ५ वर्षे जेएनयूतील दुसऱ्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार नाही. मुजीब घेट्टोला दोन सत्रांसाठी निलंबित करण्यात आले. घोषणाबाजीच्या घटनेप्रकरणी चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने ५ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली होती.
कुणावर काय झाली कारवाई
- जेएनयू वादनंतर स्‍थापन केलेल्‍या चौकशी समितीने 14 विद्यार्थ्‍यांवर कारवाई केली.
- मुजीब गट्टो याला दोन सत्रांसाठी निलंबित करून 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
- आशुतोषला एक वर्ष विद्यापीठाच्‍या हॉस्‍टेलमध्‍ये येण्‍यावर बंदी घालून 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला.
- कन्हैया आणि सौरभ शर्मा यांनाही 10-10 हजारांचा दंड ठोठावला.
- अनिर्बान भट्टाचार्यला 15 जुलैपर्यंत निलंबित करण्‍यात आले. तसेच तो 23 जुलैनंतर पुढील पाच जेएनयूच्‍या कोणत्‍याच अभ्‍यासक्रमाला प्रवेश घेऊ शकणार नाही.
- या विद्यार्थ्‍यांशिवाय रामा नागा, अनंथ कुमार, श्‍वेता राज, रुबिना आणि चिंटू कुमारी यांनाही 20-20 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
- तसेच बनोज्योत्सना लहरी आणि द्रोपदी घोष यांना पाच वर्षांसाठी कॅम्‍पसमधून बाहेर केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहे प्रकरण काय?