आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली: जमिनीवर अतिक्रमण; महाराष्ट्र अाघाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संरक्षण विभागाच्या जमिनीवर अनधिकृत ताबा घेणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश अाणि उत्तर प्रदेश अाघाडीवर अाहेत. महाराष्ट्रात १०१२ एकर जमिनीवर अतिक्रमण करण्यात अाल्याची माहिती संरक्षणमंत्री मनाेहर पर्रीकर यांनी दिली. गाेव्यात संरक्षण विभागाच्या केवळ चार एकर जमिनीवर अतिक्रमण करण्यात अाले असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.   

देशभरात संरक्षण विभागाच्या १० हजार ११६ एकर जमिनीवर अनधिकृतपणे ताबा घेण्यात अाला असून ही जमीन परत मिळवण्यासाठी संरक्षण विभागाकडून प्रयत्न सुरू अाहेत. केरळमध्ये सर्वात कमी १.८१ एकर जमिनीवर अतिक्रमण झाले अाहे. उत्तर प्रदेश अतिक्रमणाबाबत अग्रक्रमावर असून या राज्यात संरक्षण विभागाची २८७९ एकर जमीन हडपण्यात अाली अाहे. परंतु अलीकडच्या काळात अतिक्रमण करण्यात अाल्याची प्रकरणे दृष्टिक्षेपात नाहीत. केंद्र सरकारच्याच वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून अतिक्रमण हटवण्याचे काम सुरू असल्याची स्पष्टाेक्ती पर्रीकर यांनी दिली.  बिहारमध्ये ४८३ एकर, जम्मू-काश्मीर ७३१ जमीन अतिक्रमणात आहे.
बातम्या आणखी आहेत...