आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआय अध्यक्षपद सोडण्यावर एन. श्रीनिवासन यांचे मौन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - आयपीएल फिक्सिंग प्रकरणात जावई गुरुनाथ मयप्पनचे नाव आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पद सोडण्याचे आदेश देऊनही बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी चकार शब्दही उच्चारलेला नाही. मंगळवारी बोर्डाचे तीनही उपाध्यक्ष शिवलाल यादव, रवि सावंत व चित्रक मित्रा यांनी श्रीनिवासन यांना पद सोडण्याचा सल्ला दिला होता. मात्र श्रीनि यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. बुधवारी श्रीनिवासन यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले आहे. ते इतक्यात राजीनामा देणार नाहीत. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी गुरुवारी कोर्टाच्या सुनावणीची वाट पाहतील, असे संकेत आहेत. कोर्टाने मंगळवारी श्रीनिवासन यांना राजीनामा देण्यासाठी 48 तासांची मुदत दिली होती. त्यांनी स्वत:हून राजीनामा न दिल्यास आपणच निर्णय घेऊ, असे कोर्टाने सुनावले होते