आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Under Secretary Level Officer Will Receive The Document

अवर सचिव स्तरावरील अधिकारी प्राप्त करतील गाेपनीय दस्तऐवज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता कोणत्याही विभागातून सरकारचे गाेपनिय आणि अति गोपनिय दस्तऐवज केवळ उपसचिव स्तराचा विशेष अधिकारीच घेऊन जाऊ शकेल. हे अधिकारीही विशेष स्थितीत संयुक्त सचिव स्तराच्या अधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर हे दस्तऐवज बैठकीसाठी कार्यालयाबाहेर घेऊन जाऊ शकतील.
कार्मिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार त्यांना प्रसारमाध्यमाशी बोलण्यास परवानगी नसेल. केवळ मंत्री, सचिव आणि विशेष अधिकृत अधिकारी या प्रकरणात माध्यमांना माहिती देतील. सरकारने कॉर्पोरेट घराण्यांना कथितरित्या दस्तऐवज लिक केल्याप्रकरणी अनेक सरकारी अधिकाऱ्यांची अटक् केल्यानंतर हे पाऊल उचलले आहे. कार्मिक मंत्रालयाने यासंदर्भात गृह मंत्रालयाच्या विभागीय सुरक्षा निर्देशांचा हवाला दिला आहे.
सरकारी पातळीवर धोरणात्मक दस्तऐवजांची ने-आण आणि त्यातून फुटणारी माहिती ही एक मोठी समस्या आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आता विशिष्ट अधिकाऱ्यांनाच तो अधिकार देण्यात आल्याने माहिती लीक होण्याचा धोका कमी होऊ शकेल.