आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी : बँकेमध्ये बेहिशेबी रक्कम जमा केल्यास 50% कर, बाकी रक्कम 4 वर्षे गोठणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एखाद्या व्यक्तीने जर ३० डिसेंबरपर्यंत बँक खात्यात बेहिशेबी संपत्ती म्हणून ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या तर त्याला किमान ५० टक्के कर द्यावा लागू शकतो. त्याला उर्वरित रकमेपैकी अर्धी म्हणजे मूळ जमा रकमेच्या २५ टक्के रक्कम चार वर्षे बँकेतून काढता येणार नाही. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी ही बेहिशेबी रक्कम शोधून काढली तर कर आणि दंड ९० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत विचार झाला. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल. ही दुरुस्ती पुढील आठवड्यात संसदेत मंजुरीसाठी मांडली जाऊ शकते.

नोटबंदीनंतर काळ्या पैशावर २०० टक्के कर व दंड लागेल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले होते. मात्र प्राप्तिकर कायद्यात अशी कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे कायद्यात दुरुस्तीवर गुरुवारी चर्चा झाली.

लोक बंद झालेल्या नोटा नष्ट करत होते, त्यामुळे सरकार दंड कमी करत आहे...
- बेहिशेबी पैशावर कराचा काय प्रस्ताव आहे?
स्वत: सांगितल्यावर ५० % कर लागेल. म्हणजे बेहिशेबी रकमेचा निम्मा पैसा करात जाईल.

- लॉक-इनचे काय होईल?
करानंतरच्या शिल्लक पैशातील निम्मी रक्कम ४ वर्षांपर्यंत बँकेतून काढू शकणार नाहीत. म्हणजे, जमा केलेल्या पैशाचे २५ % च मिळतील.

- या नव्या योजनेचा फायदा काय?
तुम्ही दडवले व प्राप्तिकर अधिकाऱ्याला बेहिशेबी रक्कम सापडल्यास कर व दंडासह ९० % कापले जातील. म्हणजे १० % मिळतील.

- सरकारने प्रथम काळ्या पैशावर २०० % दंड म्हटले होते. ते काय होते?
३० % करावर २०० % दंडाचा अर्थ ६० %, म्हणजे कर व दंड मिळून ९० % होतो.

- प्राप्तिकर कायद्यात अशी तरतूद नाही?
होय, त्यामुळेच कायदा दुरुस्तीवर चर्चा झाली. सोमवार,मंगळवारी दुरुस्ती विधेयक येऊ शकते.

- अाधी २००% दंड हाेणार हाेता, अाता ताे ५०% का केला जात अाहे?
२०० % दंडाचे ऐकून लोक नोटा नष्ट करतायत. जास्तीत जास्त नोटा बँकेत जमा व्हाव्यात, असे सरकारला वाटते.

- करातून मिळालेल्या पैशाचे सरकार काय करेल?
दोन प्रस्ताव आहेत. एक, बाँड येईल. चार वर्षांच्या लॉक-इनचे २५ % यात गुंतवले जातील. दुसरे, वेगळा फंड होईल. त्याच्या वापरातून गावात वीज, रस्त्यासारख्या सुविधा विकसित केल्या जातील.

- घरात सोने ठेवण्याची मर्यादा निश्चित होण्याची चर्चा आहे. त्यात सत्य किती?
अशा कोणत्याही प्रस्तावाचा विचार नसल्याचे अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

प्रस्तावित कायद्याची वैशिष्ट्ये
- समजा नोटबंदीमध्ये ५० दिवसांत १० लाख रुपये बँक खात्यात जमा केलेत.
- हिशेब न दिल्यास तर ५० % कर देणे भाग. ५ लाख कपात ५ लाख वाचतील.
- शिल्लक ५ लाखांपैकीही निम्मे म्हणजे २.५ लाख रुपये ४ वर्षांसाठी गोठवले जातील.
- म्हणजे एकूण अघोषित रकमेचा २५% वाटा चार वर्षांपर्यंत वापरण्यायोग्य राहणार नाही.
बातम्या आणखी आहेत...