आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Cabinet Possible, Javdekar, Sitaraman Will Get Cabinet Ministry

अधिवेशनापूर्वी कॅबिनेट विस्तार; जावडेकर, सीतारामन यांची कॅबिनेट मंत्रिपदी बढती ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने त्यांनी मंत्र्यांच्या आजवरच्या कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. मोदींच्या कॅबिनेटमध्ये आणखी दहा मंत्री समाविष्ट केले जाऊ शकतात. त्याचबरोबर काही मंत्र्यांना पदोन्नती तर काही मंत्र्यांकडील जबाबदारी कमी करून त्यांचा भार हलका केला जाण्याची शक्यता आहे.

फेरबदलात सध्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असलेले प्रकाश जावडेकर आणि निर्मला सीतारामन यांची कॅबिनेट मंत्री म्हणून पदोन्नती होऊ शकते. संसदेचे हिवाळी अधिवेशन २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. त्याआधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो. सध्या अनेक मंत्र्यांकडे महत्त्वाची दोन किंवा त्यापेक्षा जास्त खाती आहेत. विस्तारात त्यांच्याकडील जबाबदारी कमी केली जाऊ शकते. अर्थमंत्री अरुण जेटलींकडे संरक्षण मंत्रालयाचीही जबाबदारी आहे. त्यांनी एक पद सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आणखी एक ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही रस्ते वाहतूक, जहाज उद्योग व ग्रामीण मंत्रालय अशी खाती आहेत. रविशंकर प्रसाद यांच्याकडे कायदा व दूरसंचार खाते आहे. या दोन्ही मंत्र्यांकडील एक - एक खाते काढून इतरांना दिले जाऊ शकते.

खात्यांमध्ये फेरबदल
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार क्रीडा, कृषी, रेल्वे, नागरी उड्डयन आदी मंत्र्यांकडून विविध योजना, कामांना अपेक्षित गती दिली जाऊ शकलेली नाही. त्यामुळे या मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल करण्याचा मोदींचा विचार आहे. भाजपकडे पुरेसे नेते, मंत्री नाहीत, अशी टीका काँग्रेस सातत्याने करत आहे. त्याला उत्तर म्हणूनही लवकरच विस्तार शक्य आहे. आघाडीतील घटक पक्षांना व राज्यांना संभाव्य विस्तारात स्थान दिले जाण्याची शक्यता आहे.