आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जाणता राजा’च्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का? : कृषिमंत्री राधामोहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - शरद पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा म्हणतात. त्यांना तसे एेकायला अावडतेही. ते दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री हाेते. या काळात केंद्राने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काेट्यवधी रुपयांची मदतही केली. िवविध पॅकेज िदलेत. परंतु शेतकऱ्यांची िस्थती जैसे थे अाहे! अात्महत्या अजूनही हाेत अाहेत. िसंचनाच्या क्षेत्रात जराही प्रगती नाही. पवारांनी नेमके केले काय? हा प्रश्न मला नेहमी पडतो, अशी टीका केंद्रीय कृषी मंत्री राधामाेहन िसंग यांनी केली.
वर्धाचे खासदार रामदास तडस यांनी सोमवारी कृषी मंत्री राधामाेहन िसंग यांची भेट घेतली. िवदर्भातील िसंचनाचा अनुशेषाबाबत खा. तडस यांनी अाकडेवारी सादर केली. तत्कालिन पंतप्रधान डाॅ. मनमाेहन िसंग अाणि िवद्यमान पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वेळाेवेळी राज्यातील दुष्काळासाठी मदत केली. परंतु िवदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अात्महत्या थांबल्या नसल्याकडे लक्ष वेधले.
यावेळी राधामाेहन िसंग प्रस्तुत प्रतिनिधीशी म्हणाले, मराठवाडा अाणि िवदर्भातील शेतकऱ्यांच्या दयनीय िस्थतीची मला कल्पना अाहे. परंतु वेळाेवेळी सरकारने केलेली मदत थेट त्यांच्यापर्यंत पाेहचली का? असा प्रश्नही त्यांनी केला. सहकारी संस्थांच्या घशात अनेकदा मदत गेली! या संस्था काेणाच्या अाहेत? याचा अभ्यास करा. पवारांना सातत्याने शेतकऱ्यांचा कळवळा येताे, ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हाेते मग िवदर्भ-मराठवाडा उपेक्षित का राहिले?. िसंचनाचे क्षेत्र ते का वाढवू शकले नाही? असा सवालही त्यांनी केला.
महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर तातडीने त्यांनी जलयुक्त शिवार याेजना सुरु केली. या याेजनेला केंद्र सरकार संपूर्ण मदत करीत अाहे. त्याचे चांगले परिणाम िदसून येत अाहे.

फोटो - वर्ध्याचे खासदार रामदास तडस विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या अवस्थेबद्दल कृषिमंत्री राधामोहन सिंग यांना माहिती देताना.
बातम्या आणखी आहेत...