आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Foreign Minister Sushma Swaraj News In Marathi

परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज व्हिएतनाम दौऱ्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोई- भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या व्हिएतनाम दौऱ्यास रविवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्यात त्या व्हिएतनाममधील वरिष्ठ मंत्री व अधिकाऱ्यांची भेट घेणार असून दोन्ही देशांतील संरक्षण, कृषी, औषधनिर्मिती तसेच टेक्स्टाइल क्षेत्रातील व्यावसायिक संबंधांना बळकटी मिळण्याकरिता काही महत्त्वाचे निर्णय या वेळी घेतले जातील. विशेष म्हणजे या दौऱ्याच्या एक दिवस आधी व्हिएतनामने भारताला दक्षिण चीन सागरातील दोन ब्लॉक्समध्ये तेल खननासाठी आणखी वर्षभराची मुदतवाढ दिली. या दौऱ्यात स्वराज एशियन-इंडिया नेटवर्कच्या तिसऱ्या गोलमेज परिषदेचे उद्घाटनही करतील.