आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Government Cut Hag Prilgrim Number By 20 Percent

केंद्र सरकारने हज यात्रेकरूंच्या संख्येत 20 टक्क्यांनी केली कपात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - खासगी टूर चालकांमार्फत यंदा हजला जाणा-या यात्रेकरूंच्या संख्येत केंद्र सरकारने 20 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र हज कमिटीच्या यात्रेकरूंच्या संख्येत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. परराष्‍ट्र मंत्रालयानुसार खासगी हज यात्रेकरूंच्या 45 हजार कोट्यामधून 9,995 यात्रेकरूंची कपात झाली आहे. आता खासगी टूर ऑपरेटर्सच्या माध्यमातून फक्त 35,005 यात्रेकरू हजला जातील. भारतातून 2013 मध्ये एकूण 1 कोटी 70 लाख 25 यात्रेकरू हजला जाणार आहेत. यापैकी 1 कोटी 25 लाख 25 यात्रेकरून हज कमिटीमार्फत जातील. सौदीने विदेशी यात्रेकरूंच्या कोट्यात 20 टक्के कपात केली आहे.