आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्र सरकार करणार धोकादायक औषधींवर प्रतिबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विविध आजारांवर उपचारासाठी धोकादायक ठरत असलेल्या आणि संशयास्पद वाटणार्‍या औषधींवर बंदी आणण्याचा केंद्र सरकार सध्या विचार करत आहे. यासाठी लवकरच तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली. बाजारात मोठय़ा प्रमाणात विकल्या जात असलेल्या संशयास्पद औषधींची तपासणी करून त्यांच्यामुळे होणार्‍या परिणामांचा अभ्यास ही समिती करेल. त्यानंतर या औषधी बाजारातून हद्दपार करण्यासाठी सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ) अंतर्गत एक धोरण तयार केले जाईल. याव्यतिरिक्त आरोग्य मंत्रालयासुद्धा बाजारात विकल्या जात असलेल्या संशयास्पद आणि काही देशांमध्ये आधीच प्रतिबंधित असलेल्या औषधींवर कडक पाळत ठेवणार आहे. तज्ज्ञांची समिती या औषधींची तपासणी करून बंदी घालण्यासंदर्भात सीडीएससीओला सल्ला देईल. तज्ज्ञांनी ही समिती गठीत करण्याचा निर्णय प्रा.रंजित रॉय समितीच्या शिफारशींवर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या उच्चस्तरीय बैठकीत नुकताच घेण्यात आला.
रॉय समितीने नुकतेच क्लिनिकल ट्रायल आणि नव्या औषधींच्या मंजुरीसह अनेक विषयांबाबतच्या शिफारशी आरोग्य मंत्रालयास सोपवल्या आहेत. बाजारात विक्री होत असलेल्या सर्व औषधी आणि लसींची तपासणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारसही या समितीने केली आहे. आरोग्यावरील घातक परिणामांच्या संशयामुळे आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच काही औषधींवर निर्बंध आणले आहेत. परंतु त्यानंतर त्यांनी मधुमेहाच्या औषधीवरील बंदी उठवली होती.
निर्बंधांच्या निर्णयासाठी समिती गठित करण्याबाबत विचारविर्मश
घातक औषधींची तपासणी करणार
अहवालाच्या आधारे धोकादायक औषधी केल्या जाणार हद्दपार
अंतर्गत एक स्वतंत्र धोरण बनवले जाईल.
रंजित रॉय समितीच्या शिफारशी
बाजारात सध्या विक्री होत असलेल्या सर्व औषधी आणि लसींची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती गठित करण्याची शिफारस रंजित रॉय समितीने केली.