आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राची ४० वेबपेजेसवर टाच, दहशतवाद्यांकडून इंटरनेटच्या गैरवापराचा धोका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दहशतवादी आपले हिंसक मनसुबे पूर्ण करण्यासाठी इंटरनेटचा वापर करण्याचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने काही संकेतस्थळे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य केले जात आहे. सोशल मीडियातून सांप्रदायिक तेढ निर्माण करणारा आशय प्रसारित करण्याचे काम केले जाऊ लागले आहे. त्यात पोस्ट किंवा व्हिडिआे शेअरिंगचा गैरवापर आढळून येत आहे.
केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायदा नियम २००९ अंतर्गत हा आदेश बजावला आहे. त्यानुसार काही व्हिडिआे प्रसारणावर बंदी आणण्यात येणार आहे. त्यात अल्पसंख्याकांना भडकवणारा आशय आढळून आला आहे. २९ जून रोजी सरकारने हे आदेश बजावले आहेत. सर्व संकेतस्थळे बंद करता येणार नाहीत; परंतु किमान ४० वेबपेजेस बंद केली जाणार आहेत. म्यानमारमधील अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित प्रक्षोभक व्हिडिआे आणि पोस्ट तत्काळ हटवण्यात येणार आहेत. त्यासाठी ८ जुलै रोजी नवे आदेश जारी करण्यात आले होते. डिसेंबरमध्येही केंद्राने किमान ३२ प्रक्षोभक वेबसाइट्स बंद करण्याचे स्पष्ट केले होते. सूचना काढली होती.
सरकारी संकेतस्थळांचा सहज अॅक्सेस
सरकारी विभागाची संकेतस्थळे म्हटल्याबरोबर आठ्यागाठ्या पडतात. त्याच्या अॅक्सेसची डोकेदुखी असते. म्हणूनच केंद्राने सामान्य जनतेला त्याची सहजपणे उपलब्धता व्हावी यासाठी त्याच्या फीचर्समध्ये वाढ केली आहे. राज्ये आणि केंद्र यांच्या मिळून एकूण ६ हजार वेबसाइट आहेत. त्यापैकी निम्मी संकेतस्थळे सध्या पूर्णपणे अॅक्सेस करण्यायोग्य असल्याचे सामाजिक न्याय विभागाने सांगितले.

सूत्रांनी केला. सरकारी संकेतस्थळांचे कार्य योग्य पद्धतीने चालू आहे का, हे पाहण्याची जबाबदारी ईआरएनईटी संस्थेवर सोपवण्यात आली. ईआरएनईटी संकेतस्थळांची देखरेख करेल.
आयएसमध्ये जाण्याचा प्रयत्न
काही संकेतस्थळांच्या माध्यमातून तरुण मंडळी आयएसमध्ये सामील होण्याचा प्रयत्न करत असल्याचे उघड झाले. त्यानंतर सरकारने आपली मोहीम अधिकच तीव्र केली. अफगाणिस्तान आणि इराकमधील आयएसच्या संघर्षात सहभागी होण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. हिंसाचाराच्या घटनांचे व्हिडिआे प्रसारित करण्याचाही प्रयत्न त्यांच्यामार्फत होतो.
आयएसशी संबंधित सदस्य
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या सदस्याला एनआयएने अटक केली होती. त्यासंबंधीची पोस्ट आणि व्हिडिआेला काही दिवसांपूर्वी हटवण्यात आले. त्यानंतर सरकारने पुन्हा अॉनलाइन शुद्धीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.
सावधान, गॉलरॉटेड व्हायरसचा बँकिंग प्रणालीला धोका
भारतातील इंटरनेट युजरला तज्ज्ञांनी गॉलरॉटेड नामक व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. त्याचा ई-मेल आणि बँकिंग कार्यप्रणालीला धोका निर्माण होऊ शकतो. मूळ आशयासारखाच हुबेहूब आशय तयार करण्याची याची क्षमता आहे. घरगुती इंटरनेट वापरकर्त्यांनीही याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. एकदा व्हायरसने त्यात प्रवेश केल्याबरोबर तो संगणकातील सर्व माहिती.