आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Union Home Minister Rajnath Singh Give Statement On Udhampur Terror Attack In Parliament

जिवंत पकडलेला दहशतवादी पाकिस्तानी नागरिक, चौकशी सुरु- गृहमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्ली- जम्मूतील उधनपूर जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी संसदेत निवेदन दिले. बीएसएफच्या दोन्ही शहीद जवानांना मरणोपरांत 'गॅलेंट्री अवॉर्ड' देण्यावर सरकार विचार करत असलाचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दहशतवाद्यांना जोख प्रत्यु्त्तर देणारे शूरवीर जवान व दहशतवाद्यांला जिवंत पकडून देणार्‍या स्थानिकांची गृहमंत्र्यांनी यावेळी प्रशंसा केली. विशेष म्हणजे दहशतवाद्याला पकड़ून देणा-या दोन्ही ग्रामस्थांना पुरस्कार देण्याची घोषणा सिंह यांनी केली आहे.

मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदा एखाद्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. उधमपूरमध्ये पकडला गेलेला दहशतवादी मोहम्मह नावेद उर्फ उस्मान हा पाकिस्तानी नागरिक असून त्याची चौकशी सुरु अस्लयाचे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
तो पाकिस्तानाती फैसलाबादला रहिवासी आहे. भारतात घुसखोरी करण्‍यापूर्वी त्याला दहशतवादाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. नावेदकडून दोन AK 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहे. तसेच मारला गेलेल्या एका दहशतवाद्याचे नाव नोमीन असे होते. तो देखील पाकिस्तानी नागरिक आहे.

दहशतवादी नावेदला गुरुवारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) चौकशीसाठी ताब्यात घेणार आहे. यापूर्वी त्याची बुधवारी रात्रभर कसून चौकशी झाली. बीएसएफच्या दोन्ही शहीद जवानांना मरणोपरांत 'गॅलेंट्री अवॉर्ड' देण्यावर सरकार विचार करत असलाचे राजनाथ सिंह यांनी सांगितले. याचप्रमाणे दहशतवाद्याला जिवंत पकडून देण्यात मदत करणार्‍या त्या दोन ग्रामस्थांचा पुरस्कार देऊन सम्मानित करण्‍यात येणार आहे.

दरम्यान, उधनपूर हल्लयात दोन जवान शहीद झाले असून नऊ जखमी झाले आहे. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या (बीएसएफ) ताफ्यावर हल्ला चढवला होता. बीएसएफच्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत तीनपैकी दोन दहशतवाद्यांना कंठस्थान घातले तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडले.

मुंबईतील 26/11 हल्ल्यात एकमेव जिवंत पकडलेला क्रुरकर्मा अजमल आमिर कसाबनंतर पहिल्यांदा एखाद्या दशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले आहे. मोहम्मद उर्फ नावेद असे दहशतवाद्याचे नाव आहे. नावेद पाकिस्तानी नागरिक आहे. उस्‍मानकडून दोन AK47 आणि बॅग जप्त करण्‍यात आली आहे.

गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उधनपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची राज्यसभेतही माहिती दिली. त्यावर कॉंग्रेसचे सत्यव्रत चतुर्वेदी यांनी गृहमंत्र्यांच्या निवेदनावर टीका केली. गृहमंत्र्यांच्या निवेदनात कोणतीच नवी माहिती नाही, हे तर देशातील जनतेला बुधवारी मिळाली होती.
एनआयएचे पथक दुपारी जम्मूत पोहोचणार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनआयएचे पथक गुरुवारी दुपारी जम्मूत पोहोचेल. उस्मान आपल्या ताब्यात घेऊन त्याची चौकशी करणार आहेत. हिंदुंना मारण्यासाठी आपण भारतात आल्याचे उस्मानने म्हटले आहे. तसेच असे करण्यात त्याला आनंद वाटतो, असेही त्याने सांगितले. दहशतवादी अमरनाथ यात्रेला जाणार्‍या यात्रेकरूंवर हल्ला करण्‍यासाठी आले होते. तो पाकिस्तानातील फैसलाबाद येथील आहे. त्याने भारतात घुसखोरी करण्‍यापूर्वी पाकिस्तानात 45 दिवसांचे ट्रेनिंग घेतले होते. 12 दिवसांपासून तो भारतात असल्याचेही त्याने प्राथमिक चौकशीत सांगितले. भारतात येण्यासाठी त्याला एका ट्रकचालकाने लिफ्ट दिली होती. ट्रक चालकाचा शोध घेतला जात आहे. उस्मान हा लष्कर ए तैयबाचा सदस्य असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेने केला आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, अजमल कसाब आणि उस्मानमध्ये खूप साम्य
बातम्या आणखी आहेत...