आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Rajnath Singh In Marathi News

अल्पसंख्याक, महिलांचे संरक्षण व्हायलाच हवे राजनाथ सिंहांचे पोलिसांना आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील अल्पसंख्याक, महिला आणि गरिबांसोबतच पूर्वोत्तर भागातून आलेल्या नागरिकांचे संरक्षण व्हायलाच हवे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्ली पोलिसांना आवाहन केले. राजधानीत आयोजित 68 व्या रायझिंग डे परेडच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. अल्पसंख्याक आणि त्यांच्या धार्मिक स्थळांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिस सदैव तत्पर असतील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.
राजधानी दिल्लीत महिला सुरक्षेच्या बाबतीत पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत राजनाथ म्हणाले, फक्त दिल्लीतीलच नव्हे, तर देशातील तमाम महिलांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार तत्पर आहे. देशात महिलांच्या िवनयभंगाचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकरणांवर अंकुश लागेल. दरम्यान, दिल्लीत मागच्या काही महिन्यांत चर्चवरील हल्ल्याच्या घटनांत वाढ झाली होती. याबाबत बोलताना सिंह म्हणाले, देशात राहणाऱ्या प्रत्येक अल्पसंख्याकाचे आणि त्यांच्या धार्मिक स्थळांचे संरक्षण करण्यासाठी पोलिस जागरूक आहेत. विशेषकरून पूर्वोत्तर भागातून येणाऱ्या नागरिकांच्या संरक्षणाबाबत आम्ही पुढाकार घेत आहोत.