आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Minister Rajnathsingh News In Marathi, Divya Marathi

गृहमंत्री राजनाथांना पीएमओने दाखवला पुन्हा एकदा ठेंगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधानकार्यालयाने (पीएमओ) पुन्हा एकदा गृहमंत्रालयाची शिफारस धुडकावली आहे. पीएमओने नागा शांतता चर्चेसाठी मध्यस्थ म्हणून संयुक्त गुप्तहेर संस्थेचे अध्यक्ष आर.एन. रवी यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी गृहमंत्री राजनाथसिंह यांचे स्वीय सचिव म्हणून आलोकसिंह यांच्या नावाची गृहमंत्रालयाची शिफारस पीएमओने फेटाळली होती. शुक्रवारी सरकारने नागालँडमधील बंडखोर संंघटनांसोबत शांतता चर्चेसाठी आर.एन. रवी यांना अधिकृत मध्यस्थ भारत सरकारचे प्रतिनिधी म्हणून नियुक्त केले आहे.

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मध्यस्थ म्हणून अजित लाल यांच्या नावाची शिफारस केली होती. लाल हे जुलै २०१४ मध्ये जेआयसीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त झाले होते.