आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Home Ministry Granted To 33 Percent Women In Non Military

निमलष्करी दलात 33% महिला; गृह मंत्रालयाचा हिरवा कंदील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाच्या निमलष्करी दलांमध्ये महिला शिपायांच्या संख्येत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सीआरपीएफ आणि सीआयएसएफमध्ये ३३ टक्के, तर बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपीमध्ये १५ टक्के महिलांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

देशाच्या निमलष्करी दलाच्या जवानांची एकूण संख्या सुमारे लाख असून महिलांची संख्या केवळ २० हजार आहे. केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) शिपाई स्तरावर महिलांसाठी ३३ टक्के आणि सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सशस्त्र सीमा दल (एसएसबी) आणि तिबेट सीमा पोलिस दलात महिलांसाठी १५ टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शिपाई स्तरावर ३३ टक्के महिलांची पदे भरण्यास मंजुरी दिली असल्याचे गृह मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. महिला सबलीकरणाबाबत स्थापण्यात आलेल्या समितीच्या सहाव्या अहवालातील शिफारशीनुसार हे पाऊल उचलले आहे. निमलष्करी दलातील महिलांचे प्रतिनिधित्व तातडीने वाढवण्याची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे. केंद्र सरकार आता या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी करणार आहे.

सुव्यवस्थेची जबाबदारी
जगातीलसर्वात मोठे निमलष्करी दल असलेल्या सीआरपीएफमध्ये सध्या ६३०० महिला आहेत. हे दल देशाच्या विविध भागात मुख्यत्वे कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे आणि नक्षलवादविरोधी कारवायांसाठी तैनात आहे.