आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Union Minister Charan Das Mahant Made Acting President Of The Chhattisgarh Pradesh Congress Committee

चरणदास महंत छत्तीसगड काँग्रेसचे नवे प्रभारी प्रदेशाध्यक्ष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- मागील महिन्यात नक्षलवाद्यांनी उग्र हल्ला करुन संपवलेल्या काँग्रेस नेतृत्त्वानंतर आता चरणदास महंत यांच्याकडे छत्तीसगड काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा प्रभारी कार्यभार देण्यात आला आहे. केंद्रात कृषी व अन्न राज्यमंत्री असलेले महंत हे कोरबा लोकसभा मतदारसंघातून संसदेत गेले आहेत. राज्यातील प्रमुख काँग्रेस नेत्यांची हत्या केल्यानंतर राज्य काँग्रेसमध्ये सध्या एक पोकळी निर्माण झाली आहे. 58 वर्षीय महंत सरचिटणीस दिग्विजय सिंग यांच्या जवळचे मानले जातात. राज्यातील माजी मंत्री भूपेश बागेल यांची कार्यक्रम समन्वयक म्हणून निवड करण्यात आली.

प्रदेशाध्यक्ष नंदकुमार पटेल व त्यांचा मुलगा दिनेश पटेल यांची नक्षलवाद्यांनी निर्घृण हत्या केली होती. याचबरोबर सलवा जुडूमचे प्रणेते महेंद्र कर्मा यांचीही हत्या केली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व 9 वेळा संसदेत पोहचलेले विद्याचरण शुक्ल यांच्यावरही गोळ्या झाडल्या आहेत. सध्या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. 25 मे रोजी झालेल्या या हल्ल्यात काँग्रेसच्या काही नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू यात झाला होता.