आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Giriraj Singh Relation With Ranveer Sena In Patna

मोदी सरकारमधील एक-तृतियांश मंत्री कलंकित, गिरिराज सिंह यांचा रणविर सेनेशी संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली /पाटणा - केंद्रीय लघु उद्योग राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसर्‍याच दिवशी गिरिराज सिंह वादात अडकले आहेत. बिहार मानवाधिकार आयोगाने गिरिराज सिंह यांचा संबंध बंदी घातलेल्या रणवीर सेनेशी असल्याचे म्हटले आहे. एडीआरने दिलेल्या एका अहवालानुसार मोदी सरकारमधील एक तृतियांश मंत्री कलंकित आहेत.
बिहार मानवाधिकार आयोगाचे एसपी अमिताभ कुमार दास यांनी सोमवारी स्पेशल ब्रँचचे आयजी जितेंद्र सिंह गंगवार यांना एक अहवाल पाठविला आहे. त्यातील माहितीनुसार गिरिराज सिंह यांचा बंदी घातलेली संघटना रणवीर सेनेशी संबंध आहे. त्यांनी गुप्तचर संस्थांना ही माहिती देण्याचे त्यात म्हटले आहे.
एसपी अमिताभ कुमार दास म्हणाले, की एक जून 2012 रोजी रणवीर सेनेचे प्रमुख ब्रह्मेश्वर मुखिया यांच्या हत्येनंतर गिरिराज सिंह यांनी वृत्तवाहिन्यांवर मुखिया यांना गांधीवादी म्हटले होते. मुखिया यांना श्रद्धांजली वाहाण्यासाठी ते त्यांच्या भोजपूरमधील खोपिरा येथेही गेले होते.
रणवीर सेनेने अनेक नरसंहार घडवून आणले होते. 2003 मध्ये अरवलचे तत्कालिन पोलिस आयुक्त दास यांनी रणवीर सेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची विनंती केली होती. या अहवालाबद्दल केंद्रीय मंत्र्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
पुढील स्लाइडमध्ये, मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधीपक्षाचा आरोप आणि त्याला जेटलींचे उत्तर