आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगले अन्न मिळावे यासाठी युरिया नीमकाेटेड क्रांतीवर भर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - उत्तम दर्जाचे अन्न मिळवायचे असेल तर युरियाचा वापर कमी करावा लागेल. यंदा देशात १०० % युरियाला नीमकाेटेड करण्यात अाले अाहे. यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत झाली. युरियाच्या कमी वापरामुळे शेतकऱ्यांची १५ % बचत झाली. आगामी काळात युरिया अायातीवर देशाला अवलंबून राहावे लागणार नाही, अशी माहिती केंद्रीय खते, रसायन राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी ‘दिव्य मराठी'ला दिली.

मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणात ‘युरिया नीती -२०१५’ चा उल्लेख करण्यात अाला. स्वदेशी उत्पादन अाणि ऊर्जा याच्या याेग्य उपयाेगितेसाठी या याेजनेला प्राेत्साहन देण्याची कल्पना अाहे. पुढच्या तीन वर्षात देशात दरवर्षी १७ लाख मेट्रिक टन युरियाचे अधिक उत्पादन हाेणार अाहे, तर रासायनिक कंपन्यांकडून युरियाचा हाेणारा गैरवापर नीमकाेटेडमुळे थांबविण्यास यश मिळाल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

गेल्या वर्षभरात देशात युरिया क्रांती कशी झाली, भ्रष्टाचारावर अाळा कसा बसला याबाबत अहिर म्हणाले, एक बॅग युरियासाठी सरकारला एक हजार रुपये लागतात. अाम्ही मात्र, ५५ हजार काेटी रुपये अनुदान देऊन शेतकऱ्यांना ही बॅग केवळ २९० रुपयांत उपलब्ध करून देताे. अनेक रासायनिक कंपन्यांनी सवलतीच्या दरात मिळणारा युरियाचा काळाबाजार केला हाेता. शिवाय दुधामध्येही युरियाची भेसळ करून दूध विकले जात हाेते. अामच्या विभागाने युरिया निमकाेटेड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षभरात ३१० लाख मेट्रिक टन युरियाला नीमकाेटेड करण्यात अाले. शिवाय विदेशातून अायात करण्यात येणाऱ्या ९० लाख मेट्रिक टन युरियाला पाेर्टवर अाधी नीम तेलाची फवारणी करून नंतर बॅग्ज भरण्यात अाल्यात. नीमकाेटेड केल्याने रासायनिक कंपन्यांना युरियावरील नीम अावरण काढणे अवघड झाले. दुधामधील भेसळ संपूर्ण थांबली. विशेष म्हणजे हा युरिया हवेत एकदम विरघळत नाही अाणि पाऊस अाला तर वाहूनही जात नाही. एक पाऊस थाेपवून धरण्याची क्षमता या युरियात असल्याने शेतकऱ्यांचा युरिया वाया गेला नाही. ज्यांना दहा बॅग्ज वापराव्या लागायच्या त्यांना केवळ सात बॅग्ज वापराव्या लागल्यात. युरियाचे प्रमाण कमी झाल्याने अाणि नीम हे कीटकनाशक असल्याने उत्पादकता वाढली व जमिनीची पत सुधारत आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना रोजगार
युरिया नीमकाेटेड बाजारपेठेत येत असल्यामुळे ज्या निंबाेळी वाया जायच्या त्या युरिया कंपन्यांना विकत घ्याव्या लागत अाहेत. या वर्षी १५० काेटींच्या निंबाेळ्या िवकत घेऊन त्याचे तेल काढण्यात अाले. यामुळे अादिवासी, शेतकऱ्यांना राेजगार मिळाला अाहे. मराठवाड्यात निंबाेळ्या माेठ्या प्रमाणात उपलब्ध अाहेत. त्याचाही उपयाेग केल्यास मराठवाड्यातील शेतकऱ्यांना राेजगार मिळणार अाहे.

राष्ट्रपती, पंतप्रधान नीम कोटेड युरियाचे प्रचारक
नीमकाेटेड युरियाचे खरे प्रचारक राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अाणि पंतप्रधान नरेंद्र माेदी अाहेत हे सांगताना अहिर म्हणाले, कृषी मंत्रालय लवकरच सॉइल कार्ड काढणार अाहे. त्यात रासायनिक व खते मंत्रालयाचा १० टक्के सहभाग अाहे. युरियाचा वापर कमी करावा याबाबत कार्डवर शास्त्राेक्त माहिती दिली जाईल. कृषी विभागाकडूनही युरियाची मागणी कमी हाेईल व पंतप्रधानांनी सुरू केलेले हे अभियान पुढच्या तीन वर्षांत १०० % यशस्वी हाेईल.